वाढिव विजबिलाला शेतकऱ्यांच्या संतापाचा झटका !!!
नाशिक, प्रफुल केदारे :
कोरोना मुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या पुरता अवकळलाय. एकीकडे जगण्याची धडपड तर, दुसरीकडे रोजच्या घर खर्चाची कसरत याने हैराण झालाय. त्यात या भिषण टाळेबंदीत विज महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना अवास्तव विजबिल पाठवुन त्यांची अधिकच क्रुर चेष्टा चालवलीय.
कंपनीने एप्रिल ते जून महिन्यातील बिलात सवलती देण्याऐवजी १५ ते २० टक्के वाढीव विज बिलं शेतकऱ्यांच्या माथी मारली आहेत. कंपनीने आकारलेले अंदाजे तीनही महिन्यांंचे हे सव्वा बिलं पाहून शेतकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून प्रक्षुब्धतेचा भडका उडत आहे.
याचा परिणाम म्हणून प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी ही वाढिव विजबिल तहसीलदार कार्यालयासमोरच पेटवून जाहीर होळी केली. यावेळी शेतकरी नेते क्रुष्णा जाधव यांच्या सोबतच, ग्रामिण जिल्हाअध्यक्ष राजू शिरसाठ , तालुका अध्यक्ष मधुकर पाचपिंडे , युवा अध्यक्ष महेंद्र बोरसे आदींंनी, शासनाने त्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने आकारलेले ही वाढिवबिज बिलं तातडीने माफ करण्यासाठी भाग पाडावं व सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे
तहसिलदार, दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन सादर करण्यात आले. याउपरांतही शेतकऱ्यांची या अवास्तव विज बिलाच्या विळख्यातून शासनाने सुटका न केल्यास आंदोलनाचा भडका अधिक तिव्र होईल असा ईशारा क्रुष्णा जाधव यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment