मुरबाड --{ मंगल डोंगरे } खाजगी कोवीड हाॕस्पिटल मधिल कोरोना बाधित रुग्णांचा उपचारावर होणारा खर्च सर्वसामान्य माणसाला परवडणारा नसल्याने मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी नव्याने सुरु झालेल्या ट्रामा केअर सेंटर इमारती मधील शासकीय कोवीड सेंटरमध्ये उपचार करून घ्यावेत. असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी जनतेला केले आहे.
मुरबाड शहरातील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीत नुकतेच कोविड रुग्णांसाठी सुरु झालेले शासकीय कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.लवकरच या ठिकाणी दोन फिजीशियन डाॕक्टरांची नेमणूक होणार असून सध्या सहा डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. आठ नर्सेस रुग्णांची काळजी घेत आहेत . त्याचप्रमाणें दोन व्हेंटिलेटर मशिन सुद्धा उपलब्ध होणार आहेत. सध्या ७५बेड उपलब्ध असून गरज पडल्यास अजूनही ते वाढविले जाऊन रुग्णांना हे हाॕस्पिटल सर्व सेवा देण्यास समर्थ असेल. मुरबाड मधिल शासकीय कोवीड सेंटर येथे अनेक गैरसोयी असल्याची चुकीची माहीती नागरिकांमध्ये पसरवली जात असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवु नये . आरोग्य यंञणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे असे आमदार महोदयांनी म्हटले आहे. दरम्यान वैद्यकीय अधिक्षक डॉ. नम्रता कुलकर्णी यांनी सांगितले की सध्या या ठिकाणी 31 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णांवर उपचार सूरु असून त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे. आम्ही वेळोवेळी वरिष्ठांशी संपर्कात असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या रुग्णांवर उपचार करत आहोत. सकाळी नास्ता, दोन वेळचे जेवण, चहा, वेळच्या वेळी औषधे , गरम पाणी देत आहोत तरी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी निःसंकोचपणे या सेंटरमध्ये यावे आम्ही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तत्पर आहोत.

No comments:
Post a Comment