"श्रीवर्धन येथे महावितरणच्या मदतीला टाटा पॉवरचे प्रकाशदुत."
कार्यकारी अभियंता, नेरुळ श्री सिंहाजीराव गायकवाड यांनी घेतले विशेष परिश्रम !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड येथील श्रीवर्धन येथे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले होते. रायगड येथील अनेक गावात वीजपुरवठा खंडित झाला असून ही यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी महावितरणच्या पेण मंडळासोबत दुसऱ्या परिमंडळातून मनुष्यबळाची नियुक्ती रायगड येथे करण्यात आली आहे. तसेच एजेन्सीच्या तांत्रिक कामगारांसह स्थानिक ग्रामस्थांनीसुद्धा या कामात मोलाची मदत केली आहे. पण यामध्ये विशेष म्हणून टाटा पॉवरने आपली ३० जणांची टीम महावितरणच्या मदतीसाठी रायगड येथे वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा कामासाठी पाठविली आहे. दीघी फीडरवरील दिघी, कुडगाव व हरवित गाव चक्रीवादळनंतर पुन्हा प्रकाशमान झाले आहे.
श्रीवर्धन येथील दिघी फीडरवरून जाणाऱ्या विद्युत खांब्यांवर झाडांच्या फ़ांद्या पडल्याने उच्चदाब व लघुदाब खांब कोसळले होते. गोरेगावचे कार्यकारी अभियंता श्री.अप्पासाहेब खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता श्री.संकपाळ, श्रीवर्धनचे उपकार्यकारी अभियंता श्री.महेंद्र वाघपैंजण, महावितरण लाईन स्टाफ श्री.खंडारे यांच्यासह टाटा पॉवरचे ३० तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिघी फीडरचे काम दि. ०१ जुलै पासून हाती घेतले होते. या टीमने दिघी फीडरवरचे ७० उच्चदाब विद्युत खांब व १८ लघुदाब विद्युत खांब उभे केले असून दिघी, कुडगाव व हरवित येथील वीजपुरवठा सुरु केला आहे.
दिघी फीडरवर असलेल्या कारला गावचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर असून आज सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरु होणार आहे. अधीक्षक अभियंता पेण मंडळ, श्री.दीपक पाटील यांनी दिघी येथे भेट देऊन टाटा पॉवरच्या कामाची पाहणी केली तसेच टाटा पॉवरचे पीयूष शर्मा व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
दिघी फीडरचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंता नेरुळ विभाग, श्री.सिंहाजी गायकवाड यांची विशेष नियुक्ती करण्यात आली व त्यांनी ही गावे प्रकाशमान करण्या करीता विशेष परिश्रम घेतले.
यापूर्वी टाटा पॉवरच्या टीमने अलिबाग येथे कार्यकारी अभियंता श्री.माणिकलाल तपासे व श्री सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व टाटा पॉवरचे पियुष शर्मा सोबत श्री.दिनेश तंगम व त्यांच्या टीमने पोयनाड सारख्या खारटन भागात काम करून पोयनाड फीडरवरील १० उच्चदाब खांब उभे केले. खाडी भागात असल्यामुळे गाडीवर खांब घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी ०२ कि. मी चालत सर्व खांब पाठीवर नेऊन येथील काम यशस्वीरित्या पूर्ण केले. यामुळे पोयनाड फीडरवरील जवळ-जवळ ३० ते ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डोंगराळ भागातील कुसुमबे फीडरवरचे १५ उच्चदाब खांब उभे करून टाटा पॉवरच्या टीमने दोन गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला.
"लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि समाजाचा समग्र विकास सुनिश्चित करण्याचा उद्देशाने टाटा पॉवरने नेहमीच विविध उपक्रम राबविले आहेत व यापुढे राबविणार आहे", असे टाटा पॉवरचे अधिकारी श्री.पियुष शर्मा यांनी यावेळी सांगितले.
महावितरण भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता सौ.पुष्पा चव्हाण यांनी श्रीवर्धन येथील दिघी व ईतर गावांच्या कामाची पाहणी प्रत्यक्ष केली व टाटा पॉवरने केलेल्या मदतीबद्दल भांडूप परिमंडलच्या वतीने आपली कृतज्ञता व्यक्त केली.

No comments:
Post a Comment