कल्याण पंचायत समिती मध्ये संतातर होणार? सदस नाॅट रिचेबल!
कल्याण (संजय कांबळे) बहुचर्चित कल्याण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीच्या प्रक्रियेने वेगळे वळण घेतले असून आतापर्यंत सहज होणारी निवडणूक ंं अचानक शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नाॅट रिचेबल येत असल्याने निवडणुकीत रंगत आली असून यावेळी भाजपा सत्ता गमावणार असे वाटते. त्यामुळे सत्तांतर होणार अशी परिस्थिती आहे.
राज्यात जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. कल्याण पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीमध्ये भाजपाचे 5,शिवसेनेचे 4,आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 असे 12 पक्षीय बलाबल आहे राज्य आणि जिल्ह्य़ातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती पाहता कल्याण पंचायत समितीमध्ये सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येणार हे जवळजवळ निश्चित माणले होते. कल्याण पंचायत समितीच्या 12 गणातून निवडणूक लढविणारे सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले होते. सेना व राष्ट्रवादी यांच्यात हातापाई होण्याची वेळ आली होती.या गणातील राष्ट्रवादी चा पराभव जिव्हारी लागला होता. तर काही अतिउत्साही सदस्य गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्या मध्ये निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण, अंतर्गत मतभेद, निवडणूकीच्या वेळी माघारी वरुन झालेले राजकारण, दुखावलेली मने या सर्वावर भाजपा लक्ष ठेवून होता,
आतापर्यंत आम्ही सत्तेपासून दूर राहणार आहे. सहभागी होणार नाही असे सांगणारे भाजपा सदस्य व कार्यकर्ते अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटलेल्या सदस्यांशी संधान बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाशी हातमिळवणी करून सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेस ला देऊन उपसभापती पद पदरात पाडून सत्तेत सहभागी होतात हे सर्व घडले कल्याण पंचायत समितीच्या निवडणुकीत,!
त्यामुळे कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती दर्शना जाधव आणि उपसभापती पदी भाजपा चे पांडुरंग म्हात्रे यांची निवड झाली. होती राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फुटल्याने भाजपाला शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले. ही सल सेनेला गेल्या अडीच वर्षांपासून टोचत होती आता पुन्हा अडिज वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कल्याण पंचायत समितीवर भाजपाच्या श्रीमती रंजना केतन देशमुख सभापती तर उपसभापती यशवंत दळवी हे आहेत. उपसभापती ची तर काही दिवसांपूर्वी निवड झाली तर सभापती रंजना केतन देशमुख यांना जो काही दोन ते चार महिन्यांचा कालावधी मिळाला तो कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावात गेला त्यामुळे काम करता आले नाही.
कल्याण पंचायत समिती चे सभापती पद हे सर्वसाधारण महिला यासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोन महिला सदस्यां आहेत. परंतु या दोघींनीही यादी सभापती पद भूषविले आहे. शिवसेनेकडे एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यामुळे आता सेना की राष्ट्रवादी हाच प्रश्न आहे. यामध्ये ही सभापती कोणत्या पक्षाचा व उपसभापती कोणत्या पक्षाचा हे येत्या रविवारी स्पष्ट होईल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अज्ञातस्थळी गेले असले तरी किंवा काही सदस्यांनी फोन बंद करून ठेवले असले तरी. भाजपा मात्र शांत आहे त्यामुळे ही शांतता नक्की कोणती "वादळा" पुर्वीची की?!

No comments:
Post a Comment