Friday, 3 July 2020

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चेतनसिंह पवार यांच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन !

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चेतनसिंह पवार यांच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन !


मुरबाड (मंगल डोंगरे )
बुधवार, दि. १ जुलै २०२० रोजी कृषीदिनाचे औचित्य साधुन प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री नामदार. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ब्लाॅक कमिटीचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या वार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन राॅयलस्टोन या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी करण्यात आले.
वार्षिक कार्य अहवाल मधील समाजउपयोगी कार्यक्रम व पक्ष संघटना वाढीचे कार्यक्रम पाहुन ना.बाळासाहेब थोरांतानी तात्काळ त्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर दुध महासंघ महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी मुरबाड तालुक्यात लाॅकडाऊन च्या काळातील रेशनिंग, भाजीपाला तथा मास्क, हॅन्डवाॅश आदींचा वाटप करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले. जुन २०१९ ते जुन २०२० या काळात केलेली निवडक प्रमुख कामांची मांडणी सदरील कार्य अहवाल पुस्तिकेत केली असुन पुढील वर्षांमध्ये नियोजनबध्द लोकउपयोगी व काॅंग्रेस पक्षाच्या संघटना बांधणीचे कार्यक्रम दुप्पटीने करणार तसेच पक्षातील महत्वाचे मार्गदर्शक नेते यांच्याकडे अहवाल सुपुर्द करणार असल्याचे यावेळी चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.मुरबाड तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवसंजिवनी देणारे व सतत कार्यरत राहणारे चेतनसिंह हे एकमेव नवयुवक कार्यकर्ते असुन नवतरुणांना पक्ष संघटनेत सहभागी करून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोर्चे,आंदोलने, नाहीच तर गांधीगिरी करून अधिकारी वर्गाला आपलेसे करून मुरबाड तालुक्यातील जनतेत लोकप्रिय असणारे उमदे नेतृत्व अशी त्यांची ओळख झाली असुन भविष्यात काँंग्रेस पक्षाचे एकमेव आधार स्थंभ मानले जात आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...