दिलेला शब्द न पाळल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!
मुरबाड/ प्रतिनिधी: भाजपात घुसमट होत असल्याने, दिलेला शब्द भाजपा पक्ष पाळत नसल्याने सध्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपा पक्षाला गळती लागत चालली आहे. त्यातच नुकतच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कल्याण ग्रामीण विभागात सध्या भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. नुकतच कल्याण ग्रामीण मधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या रायते गावातील अनेक कार्यकर्त्यानी भाजपा पक्षाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे .
नुकतच रायते गावातील ग्रुप ग्रामपंचायत रायते- पिंपलोली सदस्या कमल नारायण सुरोशी,नारायण हरिभाऊ सुरोशी, ओमकार सुरोशी यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला. हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व ठाणे(ग्रामीण) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुषमा लोणे, कल्याण शिवसेना तालुकाप्रमुख वसंत लोणे, कल्याण पंचायत समितीचे उपसभापती रमेश बांगर,माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र जाधव,कल्याण उपतालुकाप्रमुख विजय नारायण सुरोशी, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव, रायते शिवसेना शाखाप्रमुख भास्कर टेंभे,उपशाखाप्रमुख सुरेश सुरोशी, रायते- पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयराम रोहणे व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना रायते- पिंपलोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या वैशाली जयराम रोहणे यांनी शुभेच्छा दिल्या. रायते ग्रामपंचायतीसारख्या मोठ्या ग्रामपंचायती जर शिवसेनेच्या ताब्यात जायला लागल्या तर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार हा शिवसेनेचा असणार याचेच सूतोवाच या प्रवेशातून दिसून येते. एका बाजूला जिल्हा परिषद सेनेच्या ताब्यात, बदलापूर नगरपालिका सेनेच्या ताब्यात, मुरबाड पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेली बंडाळी यामुळे भाजपाचा कार्यकर्ता अस्वस्थ असल्याची कुणकुण जाणवत आहे . या प्रवेशा वेळी रायते गावातील युवा कार्यकर्ते नरेश सूरोशी, राजाराम सुरोशी हे ही उपस्थित होते.




No comments:
Post a Comment