Tuesday, 21 July 2020

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटी सेवा ! 'परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले जाहीर'

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटी सेवा !
'परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले जाहीर'


मुंबई : करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात कसे जायचे, असा प्रश्न सतावणाऱ्या मुंबईसह इतर शहरांतील कोकणवासीयांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. कोकणात जाण्यासाठी एसटीची बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारी जाहीर केले.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार की नाही, असा प्रश्न मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या लाखो कोकणवासीयांना पडला आहे. करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा आणि कोकणातील गावांतील दक्षता समित्यांनी याबाबत प्रशासनाला मदत करावी, असा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी कोकणात जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोकणात सरसकट सर्वाना जाता येणार नाही. करोनामुळे कोकणात जाणाऱ्यांची फार गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोकणात जाण्याची परवानगी मिळेल, अशांसाठी बसची व्यवस्था करण्याची तयारी राज्य परिवहन विभागाने केली आहे. मुंबई आणि परिसरातून तसेच पुणे व इतर भागांतून एसटी बसची सेवा देण्यात येईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...