कोव्हिड-19 मध्ये हा गणेशोत्सव प्रबोधनात्मक व आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करु या !! 'पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी'
कल्याण : कोव्हिड-19 मध्ये हा गणेशोत्सव प्रबोधनात्मक व आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करु या, असे उद्गार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. महापालिका मुख्यालयात प्रभागक्षेत्र अधिकारी, पोलिस अधिकारी व गणेश मंडळांचे सदस्य यांचेसमवेत सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात आयोजिलेल्या ऑनलाईन मिटींगमध्ये सर्वांना संबोधितांना त्यांनी हे उद्गार काढले.
सार्वजनिक गणेशोत्सव-2020 साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना दिलेल्या असून त्यामध्ये सार्वजनिक मंडळांकरीता श्री गणेशाची मूर्ती 4 फुट व घरगुती श्री गणेशाची मुर्ती 2 फुटांची असावी, त्या अनुषंगाने मंडपांची साईजही छोटी असावी, तसेच मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम/उपक्रम घेण्यात यावेत, या शासनांच्या सूचनांचे पालन करावेत असे आयुक्तांनी यावेळी सांगीतले. अनेक गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांनी नागरिकांचे घरोघरी जाऊन स्क्रीनींग करुन महापालिकेस सहकार्य केले याबाबत त्यांचे आयुक्तांनी आभार मानले.
गणेश मंडळांनी श्री गणेश दर्शनासाठी सुविधा शक्यतोवर ऑनलाईन, फेसबुक, इंटरनेटद्वारे, केबल नेटवर्कद्वारे उपलब्ध करुन दयावी, शासनाच्या सूचनांनुसार गणेश मंडपांमध्ये निर्जंतूकीकरणाची व थर्मल स्क्रीनींगची व्यवस्था करण्यात यावी, मास्क परिधान करणे बंधनकारक करावे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरात महापालिकेच्या मदतीने फिव्हर कँम्प व ॲन्टीजेन टेस्ट आयोजित कराव्यात असेही यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाचे आकडे सध्या कमी झाले दिसत असले तरी नागरिकांनी उत्सवा दरम्यान बाहेर पडू नये, गर्दी करु नये, अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
गणेश मंडळाच्या परवानगीसाठी, पोलिस स्थानकात "एक खिडकी योजना" राबविली असून तेथे महापालिकेचे कर्मचारी नियुक्त राहतील, महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (SOP) गणेशोत्सव मंडळांनी *दि. 12 ऑगस्ट पर्यंत परवानगी साठी अर्ज करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.*
गृहनिर्माण संस्थांनी शक्यतोवर त्यांचे आवारामध्येच गणेश विसर्जनाची सोय करावी अथवा महापालिका राबवित असलेल्या *"विसर्जन आपल्या दारी "* या मोहिमेत आपले गणपती महापालिकेने उभारलेल्या यंत्रणेकडेच जमा करावेत, असे पालिका आयुक्त यांनी यावेळी सांगितले.
सदर ऑनलाईन मिटींगमध्ये महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी असे मिळून 99 जणांनी सहभाग घेतला होता

No comments:
Post a Comment