Friday, 7 August 2020

मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकर शेठ मार्ग यांचे नावाचा काढलेला फलक पुन्हा लावण्यासाठी मुरबाड नगर पंचायतीची चालढकल नागरिकांचा स्वखर्चाने फलक लावण्याचा इशारा !!

मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकर शेठ मार्ग यांचे नावाचा काढलेला फलक पुन्हा लावण्यासाठी मुरबाड नगर पंचायतीची चालढकल नागरिकांचा स्वखर्चाने फलक लावण्याचा इशारा !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड शहराच्या प्रवेश द्वारावर असलेला मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ मार्ग नाम फलक पुन्हा बसवावा.अशी मागणी गेली दोन वर्षे पासून करूनही तो पुन्हा लावण्यास चालढकल केली जात असल्याने मुरबाड मधील नागरिकांनी नगर पंचायत हा नाम फलक लावण्यास तयार नसेल तर आम्ही स्वखर्चाने हा फलक लावु असाआ इशारा दिला होता.
    मुरबाड शहर हे नाना शंकरशेठ यांचे जन्म स्थान असल्याने शहराच्या प्रवेश द्वारावर तत्कालीन ग्रामपंचायतीने तीन हात नाका ते राम मंदिर या रस्त्याला नाना शंकरशेठ मार्ग यांचे नाव दिले होते .त्यांचे नावाचा लावलेला हा फलक रस्ता रुंदी करण्याचे वेळी काढण्यात‌ आला होता. तो पुन्हा लावण्यासाठी नगरसेविका कस्तुरी पिसाट यांनी 2018 व 2019 साली याबाबत नगर पंचायतीला पत्र दिले होते. तसेच माऊली सामाजिक संस्थेने सुद्धा यावर्षी जुन महिन्यात मागणी केली होती .       परंतु त्या बाबत नगर पंचायत कडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीक संताप व्यक्त करत होते. शेवटी गुरुवारी प्रसाद पोतदार ,विजेद्र देहरकर , सतीश पोतदार , अशोक  उर्फ (पप्पु) पौडवाल , चेतन पोतदार यांचे सह नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी परितोष कंकाळ , नगराध्यक्षा छाया चौधरी , उप नगराध्यक्षा अर्चना विशे यांच्या समवेत चर्चा केली असता त्यांना हा फलक लवकरच लावण्याचे आश्वासन देण्यात आले. नगरपंचायत या साठी खर्च करण्यास असमर्थ असेल,तर आम्ही खर्च करून नाम फलक लावण्यास तयार आसल्याचे. या वेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...