Friday, 7 August 2020

ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे जिल्हाध्यक्षा तोंडलीकर' : यांचा तीन हजार कोविड योध्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याचा संकल्प !!

'ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे जिल्हाध्यक्षा तोंडलीकर' : यांचा तीन हजार कोविड योध्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याचा संकल्प !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : ठाणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी ठाणे जिल्ह्यातील कोरोना योद्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प सोडला असून त्याची सुरुवात पाच ऑगस्ट पासून झाली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत हा उपक्रम पूर्ण करण्यात येणार आहे
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या प्रकारे लोकांची सेवा केली. अशा 
मुरबाड शहरातील प्रदोष हिंदुराव (समर्थ सुपर मार्केट) , मुरबाडचे पोलीस, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका, मनसे मुरबाड शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष देवेंद्र जाधव , एन. टी. टी. एफ. कोरोन्टाईन सेंटरचे अमर माने, विद्यार्थीसेना, औषध विक्रेते, बँक अधिकारी, रुग्णवाहिका चालक, रक्तपेढी डॉक्टर व कर्मचारी  यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 
    रक्षाबंधन  ते १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण मधील तीन हजार कोविड योद्यांचा गौरव करणार असल्याचे शीतल तोंडलीकर यांनी सांगितले. यावेळी   मुरबाडमधील भाजपा महिला मोर्चाच्या कामिनी गायकवाड, शिल्पा देहरकर, सुश्मिता तेलवणे, निकिता खडकबाण उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...