रायगडचा बुलंद आवाज बोरघरचे सुप्रसिद्ध कलगीतुरा गायक राजाराम जाधव आणि प्रगतशील शेतकरी रामदास जाधव यांना मातृशोक !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण कोकणच्या सांस्कृतिक नृत्य कला परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या भजन, किर्तन आणि कलगीतुरा जाखडी नृत्यकलेचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक कविवर्य रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बोरघर गावचे सुपुत्र श्री. राजाराम धोंडू जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते रामदास जाधव यांच्या मातोश्री तथा माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीचे सर्वाधिक काळ सरपंच पद भूषविणारे कार्यक्षम सर्वप्रिय माजी सरपंच श्री. धोंडू बाळू जाधव यांच्या धर्म पत्नी पार्वती धोंडू जाधव यांचे शुक्रवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२० रोजी पहाटे ३ : ०० वाजता त्यांच्या बोरघर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांचा साडी पुजन रविवार दिनांक ०९ ऑगस्ट , दशक्रिया विधी रविवार १६ ऑगस्ट तर उत्तर कार्य मंगळावर दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या बोरघर येथील राहत्या घरी होणार आहेत.
वैकुंठवासी पार्वती धोंडू जाधव यांच्या पश्चात त्यांचे पती माजी सरपंच श्री. धोंडू बाळू जाधव, त्यांचे पुत्र माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा एक प्रगतशील शेतकरी श्री. रामदास धोंडू जाधव, माणगांव तालुक्यातील किंबहुना रायगड जिल्ह्यातील पहाडी आवाजाचे सुप्रसिद्ध गायक श्री. राजाराम धोंडू जाधव, दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वैकुंठवासी पार्वती धोंडू जाधव या स्वभावाने परोपकारी आणि अत्यंत प्रेमळ होत्या. त्या सर्वांच्या सुख दुःखात नेहमी धाऊन जाणाऱ्या व हिरीरीने सहभाग घेणार्या बोरघर गावच्या सर्वप्रिय जेष्ठ महिला सदस्य होत्या. त्यांच्या निधनामुळे बोरघर गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या मृत्यूची दुःखद वार्ता कळताच त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व पक्षीय नेते, श्री. महादेव बक्कम, श्री. ज्ञानदेव पोवार तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते, मान्यवर माणगांव, तळा तालुक्यासह बोरघर, आमडोशी, पेण तळे आणि खरवली पंचक्रोशीतील सर्व बहुजन समाजातील समाजप्रिय नागरिक कोरोना विषाणू तथा कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने अधिसूचित केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे तथा शारीरिक अंतराचे काटेकोर पालन करून त्यांच्या अंत्य दर्शनासाठी उपस्थित राहून सर्व उपस्थितांनी त्यांना श्रद्धेने आणि सद्भावनेने अखेरची सामुहिक श्रद्धांजली वाहिली.

No comments:
Post a Comment