कल्याण मुरबाड महामार्गावरील खड्डे बुजवायला सुरुवात, दणका बातमीचा!
कल्याण (संजय कांबळे) : गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे आणि काल झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे कल्याण मुरबाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे' कल्याण मुरबाड महामार्गावर खड्डेच खड्डे रस्त्याची झाली चाळण, अशा मथळ्याखाली विविध वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच.
याची दखल घेऊन कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे.
पावसाला सुरवात होताच सालाबादप्रमाणे यंदाही रस्त्यावरील डोके वर काढले. त्यातच शहाड उड्डाणपूल ते म्हारळ पाडा हा सिमेंट काँक्रीट करणचा रस्त्याची भर पडली. तसेच टिटवाळा गोवेली रस्ताचे अर्धवट काम आहेच, कल्याण मुरबाड महामार्गावर शहाड, म्हारळ पाडा, वरप बंजरंग हार्डवेअर, मारुती मंदिर, बसस्टॉप, टाटा पॉवर हाऊस कांबा पावशेपाडा, रायते, दहागाव खडवली निंबवली राया सांगोडा वासुद्री कोंढेरी रस्ता या मुख्य रस्त्यासह प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
अशातच आतापर्यंत १६७५ मी मी तर काल एका दिवसात ११५ मी मी पाऊस पडला. यामुळे तर रस्त्यावरील खडी. वाहुन गेल्याने रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे या सर्व परिसराची पाहणी करून पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रातून ही बातमी सचित्र प्रसिद्ध केली. याची दखल कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका-यांनी घेऊन ताबडतोब हे खड्डे बुजवण्यासाठी कर्मचारी कामाला लावले. आज हे कर्मचारी म्हारळ वरप कांबा पावशेपाडा येथील खड्डे बुजवायला सुरुवात केली. बातमी ची दखल घेऊन खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याबद्दल नागरिकांनी बांधकाम विभागाचे व ही बातमी वेळीच प्रसिद्ध केल्याबद्दल पत्रकार संजय कांबळे यांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment