Tuesday, 4 August 2020

कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस, म्हारळ मध्ये सखल भागात पाणी, टाटापावर हाऊस जवळ रस्त्यावर नदी, यंत्रणा अलर्ट !!

कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस, म्हारळ मध्ये सखल भागात पाणी, टाटापावर हाऊस जवळ रस्त्यावर नदी, यंत्रणा अलर्ट !!


कल्याण (संजय कांबळे) : रात्री पासून पडणा-या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने चारही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीतील काही ठिकाणी सखल भागात पाणी भरले असून अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे तर कांबा व वरप दरम्यान असलेल्या टाटा पॉवर हाऊस येथील नाला जाम झाल्याने येथील कल्याण मुरबाड महामार्गाला नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र दिसत होते. असे असले तरी शासकीय यंत्रणा अलर्ट असल्याचे तहसीलदार दीपक आकडे व गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी  सांगितले.
हवामान विभागाने गेल्या चार ते पाच दिवस मुंबई ठाणे व कोकणास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. त्यानुसार कोकणात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. तर काल रात्री पासून ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू झाली होती. पण आज रात्री पासून ठाणे कल्याण शहापूर, मुरबाड म्हसा कर्जत, भिवंडी या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण तालुक्यात आतापर्यंत 170ते190 मिमि पाऊसाची नोंद झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कल्याण तालुक्यात पावसाने दडी मारल्याने बारवी, काळू, भातसा आणि उल्हास नदीच्या पात्रात अंत्यत थोडे पाणी होते. त्यामुळे सध्या तरी नदीचे पात्र भरलेले नाही. मात्र पडणा-या मुसळधार पाऊस म्हारळ गावातील आण्णासाहेब पाटील नगर, शिवशक्ती नगर, शिवानी नगर, बोडके चाळ आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. काही चाळी या नाल्याला लागून असल्याने तेथील घरामध्ये पाणी घुसल्याची माहिती आहे
परंतु म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी स्वत :भेट देऊन कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तसेच पावसाचे प्रमाण वाढले तर अशा नांगरिकाना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अनेक शाळांमध्ये सोय करणार असल्याचे सांगून या शाळांच्या चाव्या ताब्यात घेतल्याचे सांगितले. 
दरम्यान रात्री पासून पडणा-या मुसळधार पावसाने वरप कांबा या गावाच्या मध्ये असलेल्या टाटा पॉवर हाऊस येथील नाला तुंबल्याने कल्याण मुरबाड महामार्गावर पाणीच पाणी भरले होते. येथील पाण्याला नदीच्या पात्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे हा मार्ग काही काळ बंद झाला होता. 
तथापि आज सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे साचलेले पाण्याचा निचरा होईल असे वाटते. पण तरीही पाऊस थांबला नाही तर नांगरिकानी घाबरून जाऊ नये सुरक्षित स्थळी रहावे शासकीय यंत्रणा सज्ज आहे. असे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले. तर आपण सर्व ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मो...