Wednesday, 5 August 2020

माणगांव तालुक्यातील गोद नदीच्या कळमजे पुलावरून पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा प्रशासनाचा निर्णय !

माणगांव तालुक्यातील गोद नदीच्या कळमजे पुलावरून पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा प्रशासनाचा निर्णय !
   
  
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हा उपविभागीय अभियंता, राज्य महामार्ग विभाग, पेण यांनी माणगाव तालुक्यातील गोद नदीवरील कळमजे येथील पूलावरुन पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ नदी पूलावर जड वाहने थांबविण्यास मनाई करण्याबाबतही स्थानिक प्रशासनास कळविले आहे.
      त्यामुळे पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येत असून लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन फक्त दिवसा लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. पर्यायी मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी नाही. 
       राज्य महामार्ग विभाग व पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माननीय प्रियांका आयरे मॅडम तहसिलदार, माणगाव यांनी कळविली आहे. 
     सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...