दैवज्ञ समाज मुरबाड यांच्या मागणीला यश !
स्वातंत्र्य दिनी "आ.किसन कथोरे" यांचे हस्ते नाना शंकरशेठ नामफलकाचे अनावरण, !!
मुरबाड (मंगल डोंगरे ) :
मुरबाड शहराचे मुख्य प्रवेशद्वार (तीन हात नाका) ते श्रीराम मंदिर या मुख्य रस्त्यास देण्यात आलेल्या नाना शंकरशेठ मार्ग या नामफलकाची यथोचित पुनर्बांधणी मुरबाड नगरपंचायत प्रशासनातर्फे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आली.व त्या नामफलकाचे अनावरण आमदार किसन कथोरे यांचे हस्ते आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन करण्यात आले.
मुरबाडच्या मातीतील महापुरुषास आदरांजली म्हणून नामदार नाना शंकरशेठ यांचे नाव यापूर्वी ग्रामपंचायत मुरबाड यांनी मुख्य रस्त्यास दिले होते .त्या अनुषंगाने आज अस्तित्वात असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नाना शंकरशेठ मार्ग असा नामफलक बऱ्याच वर्षांपूर्वी बसविण्यात आला होता.टपाल खात्यामध्ये देखील सदर मुख्य रस्त्याची नोंद नाना शंकरशेठ मार्ग अशी करण्यात आली होती,
परंतु नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर विकासकामे होत असताना मुख्य रस्ता रुंदीकरणाच्या कामकाजामध्ये सदर मार्गाचा नामफलक गहाळ झाला होता.
सदर नामफलकाचे नव्याने यथोचित पुनर्बांधणी/पुनर्जीवन व्हावे याकरिता नगरसेविका सौ कस्तुरी किरीट पिसाट यांनी दिनांक ३०/०७/२०१८ रोजी नगरपंचायत मुरबाडकडे मागणी केलेली होती,त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने दिनांक ०३/१०/२०१८ रोजी नगरपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयास मान्यता दिलेली होती परंतु निधीअभावी सदर काम होऊ शकले नव्हते,
पाठपुरावा करण्याकरिता कस्तुरीताई यांचेमार्फत पुन्हा दिनांक २२/०७/२०१९ रोजी पत्र देण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात मुरबाड शहरातील दैवज्ञ समाजबांधव यांनी सतत या मागणीचा पाठपुरावा केला. तसेच माऊली सामाजिक संस्थेने देखील याकरिता पत्र दिले होते.
अखेर नगरपंचायत प्रशासनाने स्वनिधीतुन सदर नामफलकाची पुनर्बांधणी केली.
सदर नामफलकाचे उद्घाटन माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नगरपंचायत मुख्याधिकारी,परितोष कंकाळ, नगराध्यक्षा छाया ताई चौधरी, व उपनगराध्यक्ष,अर्चना ताई विशे,सर्व नगरसेवक व नगरसेविका,नगरपंचायत कर्मचारी वृंद,दैवज्ञ समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:
Post a Comment