राज्य सरकारने शनिवार पासून केे प्रवासाचे नियम शिथिल !!
मुंबई : राज्य सरकारने नव्याने शिथिल केलेल्या निर्बंधानुसार कारसारख्या चारचाकी गाडय़ांमध्ये चार, तर दुचाकीवर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास शनिवारपासून परवानगी देण्यात आली.
करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर केंद्र व राज्य सरकारने वाहनांमधील प्रवासी संख्येवर निर्बंध आणले होते. यापूर्वी कारसारख्या छोटय़ा चारचाकी वाहनांमध्ये चालक अधिक दोन अशा तिघांनाच तर दुचाकीवर फक्त चालकालाच परवानगी देण्यात आली होती. चारचाकी किंवा दुचाकीवर क्षमतेपेक्षा जादा प्रवासी असल्यास कारवाई केली जात होती.
गाडय़ांमध्ये चालक अधिक तीन अशा चार प्रवाशांना परवानगी असेल. तसेच दुचाकीवर दोघांना प्रवास करता येईल. रिक्षात चालक अधिक दोन प्रवाशांची वाहतूक करता येईल. प्रवासात मुखपट्टी सक्तीची करण्यात आली आहे. प्रवासी संख्येचे नवे नियम शनिवारपासून अंमलात आले. असे राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment