Tuesday, 4 August 2020

आजपासून एसटी घेऊन निघाली चाकरमान्यांना कोकणात !!

आजपासून एसटी घेऊन निघाली चाकरमान्यांना कोकणात !!


महाड : गणेशोत्सवासाठी कोकणात जायला परवानगी मिळणार किंवा नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता होती. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी दिली. मात्र त्यासाठी काही नियम पाळावे लागणार असून त्याचं पालन करूनच जावं लागणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता क्वारंटाइनचा कालावधी हा 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर सात हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळ 6 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू झाले.

एस टी मध्ये 22 लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे.

खासगी बस चालकांना एस. टी. पेक्षा दीड पटच दर आकारता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येईल.

कोकणवासीयांना 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. 12 तारखेला रात्री 12 पर्यंत पोहचतील ते होम क्वारंटाइन होतील.

ज्यांना 12 तारखे नंतर जायचं असेल त्यांना 48 तास पूर्वी कोविड 19 चाचणी करावी करावी लागेल ती निगेटीव्ह आली तरच त्यांनी कोकणात जावं असाही नियम करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...