बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राज्य उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार कुमारी आदितीताई तटकरे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे नियोजित आहे.
शुक्रवार, दिनांक ०७ ऑगस्ट, २०२० रोजी, दुपारी २ : ३० वा., महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी ३ : ०० वा. रायगड जिल्हा शांतता कमिटी बैठक. स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. सोईनुसार अलिबाग येथून सुतारवाडी, ता.रोहा, जि.रायगडकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.
शनिवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२० रोजी, सकाळी ११ : ३० वा., सुतारवाडी ता.रोहा येथून गोरेगाव, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी १ : ०० वा. गोरेगाव येथे आगमन व निसर्गचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट मार्फत संगणक व मदत वाटप. स्थळ :- दोशी वकील कला महाविद्यालय, गोरेगाव, ता.माणगाव, जि.रायगड. दुपारी २ : ३० ते ३ : ०० वा. राखीव. दुपारी ३ : ०० वा. गोरेगाव येथून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

No comments:
Post a Comment