ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चेतनसिंह पवार यांच्या Website चे लोकार्पण !
मुरबाड { मंगल डोंगरे } : .
बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते तसेच महानंदाचे चेअरमन (राज्यमंत्री दर्जा) श्री. रणजीतसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ठाणे काॅंग्रेस कमिटीचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या Website चे तसेच Android App (2.0) चे मुंबई येथील मंत्रालयामधील कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. नवीन विकसीत केलेली Website व Android App चे तंत्रज्ञान हे नव्या पिढीसोबत जुन्या पिढीला सहज समजवु शकते असे उदगार यावेळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. चेतनसिंह व त्यांची टिम हे मुरबाड-ठाणे ग्रामीण मध्ये सात्यत्याने नवनवीन लोकउपयोगी उपक्रमाचे आयोजन करत असतात. तसेच संघटना वाढीस जमीनस्तरावर उल्लेखनीय काम करत असल्याचे यावेळी रणजितसिंह देशमुख यांनी मत व्यक्त केले. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन लोकापर्यंत प्रत्यक्षात न जाता त्यांच्या समस्या आपल्या पर्यंत सहज येतील व त्या सोडवल्या जातील, तसेच आपण केलेली कामे सहज रित्या वेबसाइट व ॲप व्दारे नागरिकांपर्यंत पोहचतील अशी सुविधा या माध्यमातुन करण्यात आल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले .तसेच विचारमंचचे पालघर जिल्हाध्यक्ष यश शिंगडा यावेळी उपस्थिती होते. कोणत्याही ब्राऊझर वर Website ला भेट देण्यासाठी www.chetansinhpawar.com हे तर Android च्या प्लेस्टोअर वर Chetansinh Pawar हे टाईप करुन ॲप डाऊनलोड करता येवु शकते असे डेव्हलपर किरण पवार यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment