१७.५० बारवी विस्थापित खावटी पासून वंचित !!
मुरबाड {मंगल डोंगरे} : मुंबईची तहान भागविणा ऱ्या बारवी धरणात विस्थापित होणाऱ्या आदिवासी वाड्या गेल्या १२ वर्षापासून योग्य मोबदला आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन होत नसल्याने आप आपल्या वाड्यावस्ती सोडण्यास तयार नाहीत. त्यातच एक्ष.आय.डी.सी.ने बारवीची उंची वाढविल्याने ह्या वाड्याना पाण्याचा वेढा पडला असून पावसाळ्यात उपजीविकेचे कोणतेच साधन नसल्याने ह्या विस्थापित आदिवासींना किमान खावटी वाटप करून जिवदान देण्याची मागणी आर.पी.आय सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांनी केली आहे. विशेष म्हणजे ह्या विस्तापित वाडयापैकी चार वाड्याना दरसाल खावटी दिली जाते. उर्वरितांची उपेक्षा करण्यांत येते अस कां? असा देखील सवाल होत आहे.
बारवी धरणात घरदार जमीन जुमळा स्वाहा केलेल्या आदिवासी वाड्या गेल्या १२ वर्षापासून पुनर्वसन होण्याच्या आशेवर आहेत.वर्षानुवर्षं असे चालू आहे . पावसाळा सुरू झाला कि त्यांच्या जखमेवरील खपली काढण्याचा प्रयत्न केला जातो,किमान पावसाळ्याच्या वाईट दिवसांत शासकिय मदत मिळावी ही अपेक्षा असते. मात्र त्यातही दुजाभाव दाखवण्यात येतो.
मोहघर गावठान - २७०
२) काचकोली - ५३० ३)जांभूळवाडी - ३००
४) मारधवाडी - १५०
५) वूरुड वाडी - १०० ६)तळ्याची वाडी - ३२५
७)कोळेवाडी कातकरी वस्ती - १०० अशा ७ वाडीवरील १७५० कुटुंबांना आज पावेतो खावटी वाटप केली जातच नाही. किंवा पावसाळ्यात ह्या वाड्यावस्त्या रामभरोसे दिवस काढतात. साधी साथीच्या रोगांवर थंडी - तापा सारख्या आजारावर गोळ्या देखील शासनाकडून आरोग्यसेवेचा लाभ म्हणून देण्यात येत नाहीत. ह्या वाड्या बुडित क्षेत्रात असल्याने यांना खावटी देणे अत्यंत मोलाचे ठरेल. ह्या वाड्या लगत असलेल्या तोंडली, खांबघर, मोहघर गावठाण, कोळेवाडी ह्या वाड्यावरील आदिवासींना खावटी वाटप केली जाते. मग इतर वाड्याना का वंचित ठेवले जाते. यास्तव मायबाप सरकारने उर्वरित आदिवासींना खावटी वाटपाच पुण्य पदरात पाडून घेण्याची विनंती वजा मागणी आर.पी.आय सेक्युलर जिल्हाध्यक्ष.रविंद्र चंदने यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment