जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने भगवान श्री रामचंद्र प्रतिमा पूजन कार्यक्रम सोहळा संपन्न !!
ठाणे, प्रतिनिधी :
आज दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने अयोध्या मधील प्रभू श्री रामचंद्र भूमी पूजन निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात दीपोत्सव प्रत्येक घरात व्हावा असे आवाहन जनकल्याण सेवा फाउंडेशन संस्थापकीय अध्यक्ष श्री सचिन विष्णू फळणे वतीने करण्यात आले.हेच आवाहन स्वीकारून जनकल्याण सेवा फाउंडेशन व उद्योग अंकुर बिझनेस फोरम,महिला शक्ती नारी प्रतिष्ठान,राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान,रोजगार विभाग यांच्या सयूंक्त विद्यमाने श्री विजय फळणे, सौ सुवर्णा इस्वलकर,सौ सुलेखा गटकल,सौ स्वाती हिरवे,सौ जान्हवी माळवदे ,सीमा पुकाळे यांच्या मार्गदर्शन खाली संपूर्ण महाराष्ट्रात दीपोत्सवाचे नियोजन करण्यात आले.पुणे जिल्हा मधून श्री सुनील ढेबे, सिंधुदुर्ग जिल्हा मधून सौ.शितल मांजरेकर,रायगड जिल्हा मधून सौ.नयना तुडीलकर,कोल्हापूर जिल्हा मधून श्री.जीवन नवले,ठाणे जिल्ह्यातून श्री.निलेश अहिरे यांनी अधिक मेहनत घेतली.
आज दिनांक 5 ऑगस्ट 2020 सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस कारण आपल्या पूर्ण देशाचे स्वप्न म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्म भूमी असलेल्या अयोध्या नगरी श्रीरामचंद्र यांचे मंदिर बनवण्यासाठी भुमी पूजन 12 वाजून 44 मिनिट व 8 सेकंद ते 12 वाजून 44 मिनिट 40 सेकंद या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. TV वर आपण ही पुजा पहिली व आपल्याला या पूजेत प्रत्यक्षात सहभागी होता आले नाही तरीही घरोघरी दीप पूजा करण्यासाठी आव्हान करण्यात आले होते. हे आपले अहो भाग्य आहे की आपण ही पूजा आपापल्या परीने फुल ना फुलांची पाकळी स्वरूपात संपन्न केली. प्रभू श्रीराम यांचं मंदिर होणे ही श्रीची इच्छा!!
संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक समाजसेवक यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता .प्रत्येक समाजसेवक यांचे जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने सौ संचिता सचिन फळणे यांनी आभार मानले.श्री दशरथ उतेकर,सौ आशा कदम,सौ सविता कारेकर,सौ सुनीता सोलंकी,सौ सुनंदा यादव,श्रीमती नीला गंगावणे,सौ रजनी अत्रे,सौ भाग्यश्री हिरवे,कु संस्कृती सातारकर,कु. पूजा पुकाळे अन्य समाजसेवक यांचा सहभाग होता.

No comments:
Post a Comment