Thursday, 6 August 2020

कल्याण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनमध्येच "आपत्ती" कक्षातील फोन बंद, ग्रामसेवक स्विच ऑफ तर क्षत्रिय अधिकारी 'नाॅट रिचेबल'?

कल्याण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनमध्येच "आपत्ती" कक्षातील फोन बंद, ग्रामसेवक स्विच ऑफ तर क्षत्रिय अधिकारी 'नाॅट रिचेबल'?


कल्याण (संजय कांबळे) : कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास तात्काळ मदत आणि पुर्नवसन करता यावे यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून तालुक्याच्या ठिकाणी आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात आले परंतू तहसील कार्यालया तील या कक्षातील फोनच बंद झाला आहे. तर ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे ग्रामसेवकाचे फोन स्विच ऑफ तर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या क्षत्रिय अधिका-यारी नाॅट रिचेबल आहेत. त्यामुळे तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
२६ आणि २७ जुलै २००५ च्या महापुराच्या संकटामुळे शासन जागे झाले आणि कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती चा सामना करण्यासाठी तसेच त्यांना तात्काळ मदत व त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येवून येथे दिवसरात्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या कक्षात दुरध्वनी ठेऊन येणाऱ्या काॅलची नोंद डायरीत लिहून संबधित विभागाकडे ती ताबडतोब पाठविण्यात येत असे. 
याचा फायदा असा झाला की घटनास्थळी टिम पोहचून मदतकार्य लवकर होऊ लागले. यामुळे अनेकांचे जीव वाचू लागले. महापूर, वादळ, इमारत दुर्घटना, आग, अपघात अशा कोणत्याही परिस्थितीत ही टिम काम करु शकतात. यानुसार कल्याण तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्षाला रात्रपाळी साठी अनेक तलाठी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कल्याण पंचायत समितीच्या स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्यांच्यावर नियंत्रण व मदतीसाठी क्षत्रिय अधिका-याची नियुक्ती करण्यात आली. परंतु कालच्या भिसोळ येथील घटनेने हे सर्व किती तकलादू आहे हे दाखवून दिले. तसेच आपत्ती नियंत्रण कक्षाचे तीन तेरा वाजवले. 
कारण भिसोळ येथे बारकुबाई भाऊ ठाकरे या महिलेच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.ही माहिती घेण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला फोन केला. रिंग वाजत होती पण फोन उचलला नाही. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना फोन केला तर त्यांचा फोन स्विच ऑफ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व मदतीसाठी नियुक्त केलेल्या क्षत्रिय अधिका-यारी नाॅट रिचेबल? काय चाललंय हे कळत नव्हते. 
विशेष म्हणजे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देऊन हाय अलर्ट ची घोषणा केली होती. तरीही इतका बेजबाबदार पणा कसा काय? सुदैवाने तालुक्यात कुठेही काही अपवाद वगळता नैसर्गिक आपत्ती ओढावली नाही. यदाकदाचित तसे काही घडले असते तर याला जबाबदार कोण? याला निष्काळजीपणा म्हणायचे का? बेजबाबदारपणा? 
या संदर्भात कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांना विचारले की सध्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागात काही घटना घडली तर तो मॅसेज आपल्या आपत्ती नियंत्रण कक्षाला कळवला जातो. पण आपल्या कक्षाचा फोन बंद आहे यावर ते म्हणाले हो पण दुसरा 02512975111 हा नंबर चालू केला आहे. नागरिकांनी या नंबरवर आपत्ती किंवा मदतीसाठी संपर्क साधावा असे सांगून त्यांनी केले. 

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...