Saturday, 15 August 2020

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती !!

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती !!


वृत्त : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी व क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्यानंतर लगेचच सुरेश रैना याने सुध्दा आपली निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी मॅच जिंकलेली असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. तसेच त्याच्या सोबत असलेला क्रिकेटपटू सुरेश रैना याचे सुध्दा भारतीय क्रिकेट मध्ये मोठे योगदान आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली असली तरी आयपीएल सामन्यांमध्ये ते दोघेही दिसणार आहेत. ३९ वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...