Saturday, 15 August 2020

श्री दशनाम गोसावी समाधी बचाव समिती, नाशिक शहर व नाशिकरोड विभागातर्फे वृक्षारोपण सोहळा संपन्न...

श्री दशनाम गोसावी समाधी बचाव समिती, नाशिक शहर व नाशिकरोड विभागातर्फे वृक्षारोपण सोहळा संपन्न... 


नासिक (अण्णा पंडित) : "वृक्ष लावा अंगणात, पसरेल समृद्धी जीवनात" या उक्तीस अनुसरून गोसावी समाज एकत्रीकरणाच्या अनुषंगाने आज *शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२०* ह्या मंगल समयी,स्वातंत्र्यदिनानिमीत्त समाधीभूमी,वालदेवी तीरी, देवळाली गाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. 


या कार्यक्रमासाठी "दशनाम समाधी बचाव समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. कैलास गिरी गोसावी"(मनमाड) ऊपस्थित होते. 
तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्र.22 चे "मा.जगदिश भाऊ पवार (नगरसेवक)" महानगरपालिका नाशिक उपायुक्त 'मा.भालचंद्र गोसावी' (विभागीय लेखाधिकारी पुणे / रत्नागिरी) 'मा. यादवपुरी गोसावी' यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी दशनाम समाधी बचाव समितीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भारती, सूर्यभान गोसावी,संजय र.गोसावी, अनुप व.गोसावी (जिल्हाध्यक्ष,द.गो.स.) अरुण गोसावी, प्रकाश गोसावी (जिल्हासंपर्कप्रमुख द.गो.स.) भरत गोसावी (पत्रकार) योगेश गोसावी (पत्रकार) भगीरथ गोसावी, धनंजय गोसावी सचिव समाधी बचाव समिती, महेश बा.गोसावी शहर संघटक समाधी बचाव समिती, संदीप गं. गोसावी, संदिप शं.गोसावी, अभिनंदन गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, मोहन गोसावी उपाध्यक्ष समाधी बचाव समिती, संजय मो.गोसावी, महेश शं गोसावी सचिव समाधी बचाव समिती, संजय छ. गोसावी, बाळासाहेब गोसावी (अध्यक्ष सिडको विभाग), मधुकर व.गोसावी, हेमंत गोसावी, गणपत गोसावी मा.अध्यक्ष सातपूर विभाग, बबन गोसावी अध्यक्ष सातपूर विभाग, दिनकर गोसावी,करण गोसावी तसेच महिला कार्यकारिणीच्या लता गोसावी, सुरेखा गोसावी, ज्योती बेबीताई गोसावी जे 7 न्यूज चॅनेलचे (संपादिका) व इतर समाजबांधव उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय र.गोसावी, सूर्यभान गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन गोसावी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन  दशनाम समाधी बचाव समितीचे नाशिक शहराध्यक्ष भाऊसाहेब भारती यांनी केले तसेच  नाशिकरोड विभागातील सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...