कल्याण तालुक्यातील दहा ग्रामपंचायत हद्दीत एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग नाही प्रस्ताव पाठविण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना?
कल्याण (संजय कांबळे) : राज्यातील कोव्हीड १९ आजाराच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधासाठी केलेले स्तुत्य उपक्रम /प्रयत्न याबाबत ची माहिती प्रत्येक विभागातून एका ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्याचे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले असून त्यानुसार कल्याण तालुक्यातील १० ग्रामपंचायत आणि १९ गावात अद्याप तरी कोरोनाचा एकही पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. हे समस्त कल्याण तालुक्यासाठी अभिमानास्पद व गौरवशाली घटना आहे.
कोरोनाने भारतात व राज्यात शिरकाव केल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे गुरवली उपकेंद्र येथे कोरोनोचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर मुरबाड व भिवंडी तालुक्यात देखील कोरोनोचे रुग्ण आढळून आले. भिवंडी तालुक्यातील खारबाव, कोन, दिवा अंजूर अनगाव , मुरबाड मधील म्हसा, सरळगाव,शहापूर मधील वाशिंद अघई, शेद्रूण, टेंभा, कल्याण येथील निळजे, दहागाव आदी ठिकाणी हाॅसस्पाॅट जाहीर करण्यात आले होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, वांगणी येथेही परिस्थिती बिकट होत चालली होती.
जिल्ह्यातील 33 प्राथमिक आरोग्य केंद्रातून आतापर्यंत सुमारे २२७ जणांना जीव घमवावा लागला आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात ७हजार ६८२ रूग्ण सापडले आहेत. यापैकी ६हजार १७९ बरे झाले आहे. हे प्रमाण ८० टक्के आहे. तर जिल्हात १हजार१२७ प्रतिबंधात्मक क्षेत्र असून सध्या केवळ ३४५ प्रतिबंधक क्षेत्र उरली आहे. या केंद्रातील ७५२ कुंटूबाला गृहभेटी देऊन ६९ टक्के आरोग्य सर्व्हेक्षण केले आहे. जिल्ह्य़ातील ३लाख ७० हजार ७७३ जणांचे आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
केवळ कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतचा विचार केला तर आरोग्य अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस, कर्मचारी, ग्रामसेवक यांनी वेळोवेळी केलेल्या उपाय योजना, गावबंदी, सॅनिटायझर वाटप, मास्क, हातपाय स्वच्छ धुने आदी जनजागृती, स्वच्छता मोहीम, धुर फवारणी, सोशलडिस्टींग इत्यादी उपाययोजना केल्या. यांना मार्गदर्शन व शासकीय विविध प्रकारच्या सूचना, आदेश यांची अंमलबजावणी करिता विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न यामुळे कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या उतणे चिंचवली, उशीद अरेला, चवरे म्हसरोडी, दहिवली अडवली, पोई, बापसई,नवगाव, रुंदा आंबिवली, रोहणे अंताडे वडवली शिरडोण, वसत शेलवले या १० ग्रामपंचायत हद्दीत अद्याप पर्यंत एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही
तर सांगोडे कोंढेरी, वाकळण, आणे भिसोळ, काकडपाडा, मामणोली,.वेहळे वाहोली, राया ओझर्ली, आणि केळणी कोलीब अशा १० इतर ग्रामपंचायतींमध्ये कोरोना कोव्हीड पाॅझिटिव रुण्ग सापडेल होते. असे असले तरी तालुक्यातील १९ गावात कोरोना ला गावाच्या वेशीवर रोखून धरण्यात प्रशासन व ग्रामस्थांना यश आले हे काही कमी नाही. त्यामुळे आता आपल्या कोकण विभागातून कल्याण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा केंद्रात उदोउदो व्हावा ऐवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांची आहे.

No comments:
Post a Comment