Sunday, 16 August 2020

उल्हासनगर रिक्षा युनियन तर्फे विविध मागण्यांचे तहसील कार्यालय दरबारी निवेदन सादर !!

उल्हासनगर रिक्षा युनियन तर्फे विविध मागण्यांचे तहसील कार्यालय दरबारी निवेदन सादर !!

                     
उल्हासनगर , सिध्दांत गाडे -  कोरोना महामारीत अडचणीत आलेल्या उल्हासनगर तालुक्यातील रिक्षा चालकांना सरकारी अर्थिक मदत कर्जमाफी सवलत प्रलंबित कल्याणकारी महामंडळ अंमलबजावणी करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालय यांना रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने देण्यात आले.

कोविड -19 कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 18 मार्च 2020 रोजी अध्यादेश काढून सर्व वाहतूक तसेच रिक्षा, टॅक्सी वाहतूक बंद केली.
रिक्षा, टॅक्सी चालकांचा उदरनिर्वाह दैनंदिन उत्पन्नावर च अवलंबून आहेत. हातावर पोट असलेला समाजाचा हा घटक उदरनिर्वाहाचे साधन बंद असल्यामुळे फार मोठ्या संकटात सापडला आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांना सरकारी मदत मिळावी म्हणून महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे परिवहन विभागाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. असे युनियनचे सरचिटणीस रमेश सिंह यांनी सांगितले.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने परिवहन विभागाचे अधिकारी व रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली राज्यातील वाहतूकदारांच्या अडीअडचणी संदर्भात उपसमिती गठीत केली गेली. उपसमितीची बैठक मुंबईत संपन्न झाली. उपसमितीचा अहवाल सकारात्मक आहे परंतु शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याचे युनियनचे सरचिटणीस रमेश सिंह यांनी सांगितले.
उल्हासनगर येथील तहसील कार्यालयात रमाकांत चव्हाण ऑटो रिक्षा चालक मालक युनियन तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
1) दिल्ली, कर्नाटक, आंध्र राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना आर्थिक मदत मिळावी.
2) बजाज फायनान्स व इतर वित्तीय संस्था यांचेकडून लॉक डाऊन कालावधीत थकीत कर्ज हफ्ते दडपशाहीने वसुली केली जात आहे.
3) रिक्षा चालकांचे कर्जमाफी साठी सवलत अभय योजना जाहीर करण्यात यावी.
4) माथाडी कामगारांच्या धर्तीवर मंजूर असलेल्या रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी.
5) भविष्यात रिक्षा वाहतूक करताना जाचक अटी, शर्ती व आर टी ओ पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात येणारी अवाजवी दंडात्मक कारवाई थांबवण्यात यावी.
अशा प्रकारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत असे युनियनचे सरचिटणीस रमेश सिंह यांनी सांगितले.

कोरोना लाॅकडाऊन काळात रिक्षा बंद असल्याने रिक्षा चालक मालक यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे लवकरात लवकर सरकारने दखल घेऊन योग्य निर्णय घेण्याची गरज तथा रिक्षा चालक मालक यांना मदतीची आवश्यकता असल्याने संघटनेच्या वतीने सरकार दरबारी निवेदन देण्यात आले. कोकण विभागात एकाच वेळी प्रत्येक संघटनेच्या शाखेच्या स्थानिक पातळीवर निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचेअध्यक्ष तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सिंह बी. भुल्लर (पिंकी), रमेश सिंह मिंटी, भास्कर कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...