Sunday, 16 August 2020

ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा फी वसूलीसाठी टाकतात पालकांवर दबाव पण शिक्षकांना वेतन नाही !

ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा फी वसूलीसाठी टाकतात पालकांवर दबाव पण शिक्षकांना वेतन नाही !


मुंबई : ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा फी वसुलीसाठी पालकांवर दबाव आणत असल्याचे आरोप होत असताना त्याच शाळा आपल्या शिक्षकांना मात्र वेतन देत नसल्याचा आरोप होतोय. राज्यातील सीबीएससी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कमर्चाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे. त्यामुळे राज्यातील 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेयर एसोसिएशन (सिसवा) ने केला आहे.


राज्यात सीबीएससी अभ्यासक्रमाच्या सुमारे 800 मोठ्या शाळा असून 70 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाविना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत कोणतेही शिक्षण कार्य होत नसताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांमागे फी साठी तगादा लावणाऱ्या शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र, 50 ते 60 टक्केच पगार देत असल्याचा आरोप सिसवाच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी केला आहे. शिवाय जे शिक्षक ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेत नाही, म्हणजेच ज्यांच्या विषयांचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नाहीये, त्यांना तर "नो टिचिंग नो सॅलरी" या तत्वानुसार वेतन नाकारले जात असल्याचा आरोप ही सिसवाने केला आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...