Sunday, 16 August 2020

कल्याण तालुक्यासाठी हॅपी संडे, एकही कोरोना पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही !

कल्याण तालुक्यासाठी हॅपी संडे, एकही कोरोना पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही !


कल्याण (संजय कांबळे) : कोरोना महामारिच्या आजाराने संपूर्ण देश ग्रासला असताना कल्याण ग्रामीण भागात मात्र हॅपी संडे साजरा होतोय. कारण आज कल्याण तालुक्यात एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोनाने कल्याण तालुक्यात प्रवेश केल्यावर शहरी भागा सह कल्याण ग्रामीण भागात भंयकर भिंतीचे वातावरण पसरले होते. म्हारळ वरप कांबा, खडवली टिटवाळा आणे भिसोळ जाभूळ काकडपाडा, खोणी, बापसई मामणोली, गुरवली आदी बहुतेक सगळ्या गावात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. कालपर्यंत कल्याण ग्रामीण भागात ५५० रुग्ण होते यापैकी ३६१ बरे होऊन घरी गेले आहेत. तर कालपर्यंत २० लोकांनी आपला जीव गमावला आहे. तालुक्यात आताही १६९ अॅक्टिव पेंशंट आहेत. संस्थात्मक कोरोनटांइग ची संख्या १७२४ इतकी आहे तर होमकोरोंटाईंग रुग्णाची संख्या ८७५ इतके आहे.
मात्र आजच्या रविवारी एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...