Sunday, 16 August 2020

उल्हासनगर रिक्षा युनियन तर्फे विविध मागण्यांचे तहसील कार्यालय दरबारी निवेदन सादर !!

उल्हासनगर रिक्षा युनियन तर्फे विविध मागण्यांचे तहसील कार्यालय दरबारी निवेदन सादर !!

                             
उल्हासनगर, सिध्दांत गाडे - कोरोना महामारीत अडचणीत आलेल्या उल्हासनगर तालुक्यातील रिक्षा चालकांना सरकारी अर्थिक मदत कर्जमाफी सवलत प्रलंबित कल्याणकारी महामंडळ अंमलबजावणी करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालय यांना रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने देण्यात आले.

कोरोना लाॅकडाऊन काळात रिक्षा बंद असल्याने रिक्षा चालक मालक यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे लवकरात लवकर सरकारने दखल घेऊन योग्य निर्णय घेण्याची गरज तथा रिक्षा चालक मालक यांना मदतीची आवश्यकता असल्याने संघटनेच्या वतीने सरकार दरबारी निवेदन देण्यात आले कोकण विभागात एकाच वेळी प्रत्येक संघटनेच्या शाखेच्या स्थानिक पातळीवर निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचेअध्यक्ष तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सिंह बी. भुल्लर (पिंकी), रमेश सिंह मिंटी, भास्कर कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...