पाऊस आला धाऊन रस्ते गेले वाहून, बारवी डॅम अद्यापही साडेतीन मीटर रिकामेच !!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात गेल्या एक आठवड्या पासून पडणा-या मुसळधार पावसामुळे उल्हास, बारवी, भातसा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर भात शेतीला पुरेसा पाऊस झाला आहे पण यामुळे रस्ते मात्र वाहून गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. पण पाणीपुरवठा करणारे बारवी डॅम अद्यापही साडेतीन मीटर रिकामाचं आहे.
कल्याण तालुक्यात भात लावणी सुरू असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. तालुक्यातील काही गावातील भात लावणी रखडली होती, बळीराजा वरुणराजाची अतुरतेने वाट पहात होता आणि पाच आॅगस्ट पासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली. काही ठिकाणी खड्डे बुजवायला सुरुवात झाली. पण यांनतर पावसाने जोर धरला. काळू नदीच्या परिसरात चांगला मुसळधार पाऊस पडल्याने नदीवरील रुंदा पुल काल सकाळी पाण्याखाली गेला होता यामुळे १०/१२ गावाचा संपर्क तुटला होता. तर उल्हास, बारवी आणि भातसा या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. आवश्यकतेनुसार पाऊस आला धाऊन असे वाटत होते. पण यामुळे कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा, वरप, टाटा पॉवर हाऊस कांबा, पावशेपाडा, पांजरपोळ, रायते, येथील रस्ता वाहून गेला असे वाटत होते. तर गोवेली टिटवाळा या रस्त्यासह निंबवली, राया खडवली रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या पावसामुळे नदी नाले भरभरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांना जोडणा-या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे
असे असले तरी बारवी धरन पाणलोटक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. तरी अद्याप धरन भरण्यासाठी साडेतीन मीटर बाकी आहे. ते भरल्यावर स्वयंचलित दरवाजे उघडले जातील तरी नदी काटच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन बारवी डॅम प्रशासनाने केले आहे.


No comments:
Post a Comment