Friday, 18 September 2020

पनवेल महानगरपालिकेत कोविड-19च्या उपाययोजनेला प्राधान्य द्यावे - 'राज्यमंत्री कु. आदिती तटकरे'

पनवेल महानगरपालिकेत कोविड-19च्या उपाययोजनेला प्राधान्य द्यावे - 'राज्यमंत्री कु. आदिती तटकरे'


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९च्या उपाय योजनांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, आशा सूचना उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिल्या.
मंत्रालयात आज पनवेल  महानागरपालिकेतील कोविड-19 उपाय योजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.  
कुमारी तटकरे म्हणाल्या, कोविड-19च्या रुग्णांची वाढीती संख्या पहाता येणाऱ्या काळात पालिकेच्या इतर खर्चांवर नियंत्रण ठेवून वैद्यकीय सुविधांवर अधिक भर देण्यात यावा. सद्यस्थितीत महानगरपालिका हद्दीतील डॉक्टरांची संख्या, हॉस्पिटल्स, उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा या बाबींकडे अधिक लक्ष दयावे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक लोकप्रतिनीधींनी तरुण स्वयंसेवकांना सहभागी करुन घ्यावे,  तसेच या टीम नी  घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय माहिती संकलन करून योग्य मार्गदर्शन करावे आणि नागरिकांनी सुद्धाया टीमला सहकार्य करावे असे आवाहनही कु. तटकरे यांनी यावेळी केले.
बैठकीला महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...