Friday, 18 September 2020

कल्याण तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची शतकाकडे वाटचाल तर ठाणे जिल्हा परिषदेचे चार कर्मचार्‍यांना देवाज्ञा ?

कल्याण तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची शतकाकडे वाटचाल तर ठाणे जिल्हा परिषदेचे चार कर्मचार्‍यांना देवाज्ञा ? 


कल्याण (संजय कांबळे) : राज्यात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी आणि राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेमध्ये कोरोना ने शिरकाव केला असून अनेक कर्मचारीवर्ग कोरोनोच्या संपर्कात आलेत तर कल्याण तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू पावणा-याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

ठाणे जिल्हा परिषद राज्यात महत्त्वाची मानली जाते. सुमारे ६हजार ५०० कर्मचाऱ्यांना ठाणे जिल्हा परिषद नियंत्रित करते. या कर्मचाऱ्यांना कोरोनाने घाटले यातील ३५ ते ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शिपाई कोरोना पाॅझिटिव आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांची आई व बहिणीचाही यात मृत्यू झाला तसेच आरोग्य सेवकांचा, पाणी पुरवठा विभागाचा कर्मचारी यांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अजून देखील बरेचजण संपर्कात आल्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेचे प्रत्येक तालुक्यातील कर्मचारी कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे शिकार झाले आहेत.
कल्याण तालुक्याची स्थिती तर खूपच बिकट बनत चालली आहे. दिवसागणिक येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असतानाही वरप येथील कोव्हीड केअर सेंटर सुरू झालेले नाही. तालुक्यात आतापर्यंत अक्टीव रुग्ण १३८० आहेत. तर मरणा-याची संख्या ८९ वर पोहोचली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मात्र कल्याण तालुक्यात "कोरोना सेंच्युरी" व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राजकारण्यांनी आणि नागरिकांनी आप आपसातील मतभेद विसरून मी मोठा की तो मोठा, मी का त्याच्याकडे जाऊ आदी इगो बाजूला ठेवून प्रशासनाच्या मानगुटीवर बसून आपले हक्काचे वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर सुरू करुन घ्यायला हवे!
अजून एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या सगळीकडे माझे कुंटूब माझी जबाबदारी हे चालू आहे. यामुळे घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. यामध्ये जर कोरोनाचे पेंशंट सापडले तर ते ठेवणार कुठे आणि कसे? याचाही  विचार करायला हवा. अन्यथा "मेरा नंबर कब आयेगा" अशी म्हणायची वेळच येणार नाही. त्यामुळे संकट ओळखा आणि जागे व्हा

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...