मुरबाड नगर पंचायतची धडक कारवाई,,! **मास्क न वापरल्यास 500 रू दंड वसुलीला सुरुवात **
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड शहरात फिरताना मास्क न वापरल्यास 500 दंड या धडक कार्यवाहिला मुरबाड नगरपंचायतीच्या वतिने सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कंकाळ यांनी दिली.
मुरबाड तालूक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसा गणिक वाढत चालली आहे. मुरबाड बाजारपेठ ही तालुक्यातील मुख्य बाजार पेठ असल्याने व औद्योगिक क्षेत्र असल्याने या शहरात ये-जा करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून मास्क लावणे व न लावल्यास 500 रू दंड अशी कारवाई करण्यात यावी असा आदेश मुरबाड चे तहसिलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष अमोल कदम यांनी काढला होता. या आदेशाची दखल घेऊन 26 मे पासुन ही कारवाई व्यापारी वर्गापुरतीच मर्यादीत केली जात होती. मात्र दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने आता ही धडक कार्यवाही नगरपंचायतीच्या वतीने पोलीसांची मदत घेऊन सुरु करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईची माहीती जनतेला व्हावी म्हणून स्पिकरवरून जन जागृती केली जात आहे. 26 मे पासुन आता पर्यंत 40 हजार दंड वसुल केला असल्याची माहिती कंकाळ यांनी दिली.
पोलीसांच्या मदतीने मास्क न लावणा-यांवर लक्ष ठेवणारे पोलीस व नगरपंचायतीचे कर्मचारी.संपूर्ण नगरपंचायत हद्द व बाजारपेठेत तैनात करण्यात आले आहेत. मात्र अनेकांना संसर्ग होऊन व अनेकांचे जिव जाऊन ही जनता आपले हिंडणे फिरणे,आटोक्यात आनत नसल्याने बिचारे निरापराध नागरिक कोरोनाचे बळी ठरत आहेत. तसे होऊ नये ,कोरोना संकट आटोक्यात यावे,यासाठी नगरपंचायतला नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागत असल्याचे मुख्याधिकारी कंकाळ यांनी आमचे प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना सांगितले आहे.

No comments:
Post a Comment