विवाह बाह्य संबंध सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन कडून उल्लंघन !!
'कोणताही गुन्हा घडला नसता नाही महिलेच्या मित्रास अवैधरित्या अटक'
विठ्ठलवाडी, आदर्श भालेराव : कौटुंबिक वाद असलेल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या महिलेच्या विरोधात त्याच्या पत्नीचे अनेतिक संबंध आहेत तिच्या पतीने तक्रार केली असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेचे मित्र यांना अनधिकृतपणे अटक केली आहे यासंदर्भात महिलेने मानवी अन्याय निर्मूलन संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई कानवडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता सुवर्णाताई कानडे यांनी सदर पोलिसांनी खाजगी प्रकरणासंदर्भात महिलेचे मित्र यांना कोणत्या आधारे पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे यासंदर्भात विचारणा केली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भाने यांनी मानवी अन्याय निर्मूलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सौ सुवर्णा ताई कानवडे यांना पोलिसांना जॉब विचारण्याचा अधिकार नाही असे उद्धटपणे सांगितले सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधात परवानगी दिली असताना देखील पोलीस आपल्या मनमानी कारभाराने आपल्या पदाचा गैरवापर करून नागरिकाला स्वतंत्रपणे जगण्यास बंदी घालत आहे असे स्पष्ट आढळून येत आहे एखाद्या महिलेचे खासगी आयुष्य यात पोलिसांना कोणताही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसताना देखील विठ्ठल वाडी पोलिसांनी महिलेच्या खाजगी जीवनात दखल देऊन मानवी अधिकाराचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन केले आहे त्यासंदर्भात मानवी अन्याय निर्मूलन संघटना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भारतीय दंड संहिता कलम 220 भंग केल्या बद्दल व विवाह बाह्य संबंध सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन केल्याबद्दल, मानवी अधिकाराचा भंग केल्याबद्दल ठाणे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त उल्हासनगर यांच्याकडे तक्रार करणार आहेत सदर पोलीस महिलांच्या खाजगी जीवनात दखल देऊन त्यांना मानसिक छळ करण्याचा भयानक प्रकार करत आहे असे कौटुंबिक हिंसाचारास बळी असणारी पीडित महिलेने मानवी अन्याय निर्मुलन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा ताई कानवडे यांच्या कडे तक्रार केली आहे.

No comments:
Post a Comment