कोरोनावर मात करण्यासाठी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यावर भर, घरोघरी होणार तपासणी !
कल्याण (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढणारे कोरोना चे पेंशंट चा धसका घेऊन आता तो आटोक्यात आणण्यासाठी कोरोना पाॅझिटिव आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला तर कोरोना आटोक्यात येईल असा सुर आज झालेल्या आरोग्य विभागाच्या व्हिडिओ काॅन्फरिन्स बैठकीत आळवण्यात आला.
कल्याण तालुक्यात सुरुवातीला कोरोना कोव्हीड पाॅझिटिव रुण्ग कमी प्रमाणात होते. ग्रामपंचायतीने गावबंदी, व इतर अनेक उपाययोजना करुन कोरोनाला वेशीबाहेर ठेवले होते. परंतू लाॅकडाऊण मध्ये सूट देण्यात आली. तसेच गणपती उत्सवात गर्दी वाढली, आणि कोरोनाला आयतीच संधी मिळाली. ज्या ग्रामपंचायत हद्दीत एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही त्या भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. फक्त आजचा विचार केला तर दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत तब्बल ३१ कोरोना पाॅझिटिव रुण्ग आढळून आले आहे तर खडवली अंतर्गत ७सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकूण पाॅझिटिव रुण्गांची संख्या ७०० वर गेली आहे. तर मरणा-याची संख्या ३० वर पोहोचली आहे. अशीच परिस्थिती मुरबाड, शहापूर तालुक्यात झालेली आहे. त्यामुळे येथे १० दिवसांचा लाॅकडाऊण करावा अशी मागणी येथील सर्वच संघटनांनी केली आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे रुग्ण पाॅझिटिव आले आहेत त्यांचे काॅन्टॅक्ट ट्रेस करुन त्यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना कोव्हीड अॅन्टीजेन चाचणी केली तर कोरोना आटोक्यात येईल असा सूर आज झालेल्या आरोग्य विभागाच्या विडिओ काॅन्फरिन्स बैठकीत आळवण्यात आला. यासाठी चार ते पाच दिवसात एक एक टिम तयार करुन घरोघरी जाऊन कोरोनोच्या रुग्णांचा शोध घेण्यात येणार असून लक्षणे असणाऱ्या रुग्णाची गोवेली व उल्हासनगर येथे कोरोनो ची तपासणी करण्यात येणार आहे. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यांनतर तरी कोरोनाचा नायनाट व्हावा हीच अपेक्षा!

No comments:
Post a Comment