Saturday, 12 September 2020

अंगणवाडीतील लहानग्यांच्या तोंडचा घास काळ्या बाजारात, कल्याण पंचायत समितीची सुपरवायझर जाळ्यात?

अंगणवाडीतील लहानग्यांच्या तोंडचा घास काळ्या बाजारात, कल्याण पंचायत समितीची सुपरवायझर जाळ्यात?


कल्याण (संजय कांबळे) : लाॅकडाऊण काळात कोरोना कोणाला कशी बुद्धी देईल हे सांगता येत नाही. कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या जिवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या सुपरवायझर ने चक्क अंगणवाडीतील बालकांना वाटण्यात येणारा "तोंडचा घास" काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना टेम्पो या विभागाचे उपमुख्यकार्यकारी व कल्याण प्रकल्प अधिकारी यांनी रंगेहाथ पकडून मानपाडा पोलीस ठाण्यात नेला. त्यामुळे कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याची जाणीव होते.


सध्या जग कोरोनोच्या वाढत्या संकटामुळे हैराण झाले आहे. देशात, राज्यात, जिल्हात आणि पर्यायाने तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या चार ते पाच महिने तालुक्यात लाॅकडाऊण आहे. या काळात अंगणवाडीतील बालकांना वेळेवर सकस आहार मिळावा, कोणीही कुपोषित राहू नये म्हणून शासनाने गरोदर माता व लहान बालकांना महिन्यातून एकदा गहू, मसूरडाळ, चणाडाळ, मिरचीपावडर, हळद पावडर, मीठ आणि तेलाची पन्नी तर 3ते 6 वर्षे वयाच्या बालकांना तांदूळ, चणा, मसुरडाळ, हळद, मीठ आणि तेल असे वाटपासाठी देण्यात येत होते. कोरोनोच्या काळात कोरोना योद्धा म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्ती काम सांभाळून हा आहार वेळच्या वेळी वाटप करित होते. मात्र निळजे 1आणि निळजे या बिटात वेगळेच घडत होतं.
कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या या बिटाच्या सुपरवायझर श्रीमती घुगे यांनी काही पाॅकिट जमा करुन ठेवली होती. पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी काही बचत गटाच्या महिलांकडे पैशाची मागणी करत असलची तक्रार येथील जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी सीईओ कडे केली होती. त्यातच 27 गावातील काटई, निळजे, दावडी, आदी गावातील अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप होत नसल्याची कुणकुण या विभागाचे उपमुख्यकार्यकारी भोसले यांना लागली होती.. तसेच कल्याण पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे यांना देखील हे माहिती होते. त्यामुळे त्यांनी श्रीमती घुगे हिच्या वर पाळत ठेवली होती. जमा केलेल्या आहार ती काळाबाजार विकणार अशी खात्रीलायक माहिती डेप्युटी सीईओ भोसले व प्रभारी प्रकल्प अधिकारी उषा लांडगे यांना मिळाली होती. त्यामुळे आज दुपारच्या वेळी टेम्पो क्रमांक एम एच 0,एच डी 0483 हा रंगेहाथ पकडण्यात आला. तो तसाच मानपान पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या आहार पाॅकिटाची मोजदाद सुरू असून गहू तांदूळ, तेल डाळी, यांची 150/200 पाकिटे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर च्या मालाची किंमत दिड ते दोन लाखांच्या घरात असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे व या बाबतीत प्रेस नोट काढण्यात येईल असे महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रत्नप्रभा भगवान तारमळे यांना डेप्युटी सीईओ श्री भोसले यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असे सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी सांगितले. 
तसे पाहिले तर ठाणे जिल्हा परिषदेवर व कल्याण पंचायतवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ते हा बोकाळलेला भ्रष्टाचार कसा रोखणार हा खरा प्रश्न आहे. तर झेडपी व पंचायत मध्ये हे तर झाकी है अबी बहुत कुश बाकी है! 
जो सापडेल तो चोर जो सापडला नाही तो साव अशी परिस्थिती आहे. परंतू काही असले तरी भ्रष्टाचार करण्याची ही वेळ व काळ नाही तेही कोरोना सारख्या महामारीत? 

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...