आमदार किसन कथोरे,यांच्या सह मनसे,कुणबी संघटनेनेही केली पुन्हा एकदा मुरबाड लाँकडाऊनची मागणी !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात गौरी - गणपती सणानंतर मुरबाड शहरासह ग्रामिण भागात रोज कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ग्रामिण भागात कोरोनाने थैमान घातलेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकां मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत मुरबाड तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या ही ८00 पर्यंत पोहचली असून यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अगोदरच आरोग्य कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या असल्याने त्यांच्यावर सध्या कामाचा खूप ताण आहे . ते आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत . त्यांच्यातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी किमान १0 १५ दिवसांच्या कडक लाॕकडाऊनची गरज असल्याने मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पञ देऊन पुन्हा एकदा लाॕकडाऊनची मागणी केली आहे.तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर,व कुणबी समाज संघटनेने मुरबाड चे तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देऊन मुरबाड शहरासह संपूर्ण तालुका हा किमान 15 ते 20 दिवस कडकपणे बंद ठेवावा अशी विंनती केली आहे.आज मुरबाड तालुक्यात दोन खासगी व सरकारी कोव्हीड हाँस्पिटल असताना सुद्धा वेगाने वाढणा-या रुग्ण संख्येमुळे रुग्ण ठेवण्यास जागा नाही.
सुरवातीच्या काळात सरकारी नियम व सुचनांचे काटेकोरपणे पालन करून मुरबाड तालुका कोरोना मुक्त ठेवण्यास मुरबाड करांना शंभर टक्के यश आले होते.मात्र आजची परिस्थिती पाहिली तर जिव मुठीत घेऊन जगणे ही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत भले एकवेळ उपाशी राहावे लागले तरी चालेल.पण कोरोनाचा आजार नको.आणि म्हणुनच पुन्हा एकदा बाजार पेठा,उद्योग धंदे दहा-पंधरा दिवस बंद राहुद्या.आणि कोरोना रोगाची साखळी तुटून सर्वसामान्य जनतेला सुखाने जिवन जगुद्या.अशी सर्व सामान्य जनतेची आर्त किंकाळी आता ऐकू येवू लागली आहे.

No comments:
Post a Comment