Saturday, 12 September 2020

विविध समस्यांबाबत मनसे आक्रमक,, तर मुख्याधिकारी, व गटविकास अधिकारी यांकडे निवेदना द्वारे केली मागणी !!

विविध समस्यांबाबत मनसे आक्रमक,, तर मुख्याधिकारी, व गटविकास अधिकारी यांकडे निवेदना द्वारे केली मागणी !!     


मुरबाड (मंगल डोंगरे) :-         
*: मुरबाड शहरातील नळांच्या पाण्याची वेळ रामभरोसे*
* नोकरी करणाऱ्या महिलां राहतात पाण्या पासून वंचीत.*
* वेळेचे नियोजन करा शहर मनसेची नगरपंचायती कडे मागणी*
* भाड्याच्या पडक्या अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका..!
* गावठाण जागा उपलब्ध असताना अंगणवाडी  इमारती  बांधण्यास प्रशासनाची अनास्था..
* गटविकास अधिकाऱ्यांकडे मनसेचे निवेदन.*.
 मुरबाड तालुक्यात आता म न से विविध समस्यांबाबत आक्रमक झाली असुन,
मुरबाड शहरातील सर्वच प्रभागा मध्ये पिण्याचे पाण्याचे नळ कोणत्याही वेळेवर येत असतात.रात्री अपरात्री, सकाळी मन मानेल त्या वेळेला नळांना पाणी येते. या मुळे महिला वर्गाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वेळेचे नियोजन नसल्याने महिलांना पाण्या साठी ताटकळत पाण्याची वाट बघत राहावे लागत आहे. तर काही नोकरी,मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना काम करावे की पाणी भरण्यासाठी घरी थांबावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रश्नावर मुरबाड शहर मनसे कडे अनेक महिलांनी गाऱ्हाणे मांडले या वर तात्काळ मनसेने मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन महिला वर्गाची ही समस्या सोडवण्या बाबत रीतसर पत्रव्यवहार केला आहे. तर  मुरबाड शहरातील अंगणवाड्या ह्या भाड्याच्या पडक्या खोल्यां मध्ये भरवल्या जात आहेत.नादुरुस्त खोल्यां मध्ये छोटे बाल विद्यार्थी जिव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत.शहरात गावठाण जागा उपलब्ध असतांना ही अंगणवाडी इमारती का उभारल्या जात नाहीत की एखादा जिव गेल्या शिवाय प्रशासनाला जाग येणार नाही.या महत्वाच्या विषया संदर्भात मनसेने मुरबाडचे
गटविकास अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून लवकरात लवकर या विषयी निर्णय घेण्यात यावा असे मनसेने म्हटले आहे.
महिलावर्गाला भेडसावणारी ही समस्या जाणून घेऊन एका निर्धारीत वेळेत शक्यतो सकाळी सहा ते आठ या वेळेत नळ सोडल्यास महिला वर्गाची अडचण दूर होईल. तरी या गंभीर विषयाकडे आपण तातडीने लक्ष घालून निर्धारीत वेळ निश्चित करावी व तसे  महिलांना सुचित करावे, जेणे करून सर्वाना पाणी मिळेल व पाण्याच्या होणारा अपव्यय सुद्धा टळेल असे मनसेने  दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
याप्रसंगी निवेदन देण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष नरेश देसले, सचिव तुषार म्हसे, सहसचिव दिप्तेश गोरे, उपाध्यक्ष सागर भंडारी, विलास हुमणे, अशपाक बेग, शहरसंघटक कैलास खरे, मोहन कराळे, कीर्ती गोहिल, अजहर पानसरे, शहर सहसंघटक रिजवान जुवारी, हरिश्चंद्र जाधव, राहुल जाधव, तसेच संदीप गोतावळे, सिद्धेश शहाणे, भूषण माळी, सागर रातांबे इ. महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...