रायगड जिल्ह्यातील टोल चा झोल बंद करा अन्यथा संपूर्ण रायगडात टोलविरोधी आंदोलन करणार : विश्वतेज साळवी
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यामध्ये टोलनाक्यावर जनतेची होणारी लूट थांबविण्याकरिता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून रायगड मधील टोल नाके बंद करणार असल्याचा ईशारा वंचित रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी यांनी पाली येथे झालेल्या बैठकीत दिला.
दिनांक ११ रोजी सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांचे निवासस्थानी रायगड जिल्हा वंचित च्या कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर होणाऱ्या लुटीचा लेखाजोखा मांडला. यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर असलेल्या मुख्य टोलवर १०३ रुपये इतका टोल पूर्वी आकारला जात होता तो अचानक वाढवून दोनशे रुपये केल्याने जनतेच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. तसेच शेेेेरंंडुग येथे असलेल्या टोल नाक्यावर सोयी सुविधांचा अभाव असून रस्तादेखील खड्डेमय आहे.
असे असताना देखील तेथे सक्तीने व दादागिरी करून टोल आकारला जातो. तर अनेक टोल नाक्यांचा कालावधी संपला असून देखील ते राजरोसपणे सुरू आहेत. अशी माहिती सर्व कार्यकर्त्यांनी वंचित जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे मांडली. यावर प्रतिक्रिया देताना रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी यांनी सांगितले की , संपूर्ण जगासह भारतात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे मागील पाच महिन्या पासून जनतेच्या हाताला काहीच काम नाही. लोकांची आर्थिक कुचंबणेमुळे अक्षरश फरफट झाली आहे. अशा परिस्थितीत हे सरकार टोल नाके लावून जनतेचा उरलासुरला जीवही काढत आहे. ही अन्यायकारक बाब अाहे.
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर हे जनहितासाठी निरंतर लढत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सरकारला आवाहन करणार आहोत की, आपण टोल नाके बंद करा, अथवा जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव टळत नाही तोपर्यंत टोल नाके बंद करा,अन्यथा वंचित बहुजन रायगड भर टोल विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय विश्वतेज साळवी यांनीनी सुधागड तालुका येथे झालेल्या बैठकीत दिला.
सदर बैठकीला वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेेज साळवी, महासचिव सागर भालेराव, सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, संदीप गाडे खालापूर तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे , किरण मोरे, स्वप्नील गायकवाड ,नारायण जाधव, आनंद जाधव, संजय घाग, विशाल मातोळे, प्रशांत जाधव, सिद्धार्थ सोनवणे, सारथी महामुंकर, प्रदीप वसंत ढोले लोकेश चंद्र यादव, सुनील देऊ गायकवाड, गणेश बनसोडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment