मुरबाड तालुक्यातील पळू ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीला वादाचा कोरोना तीनदा लाखोंचा निधी गेला परत?
कल्याण (संजय कांबळे) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ना ने घाटाच्या जवळ असलेल्या मुरबाड तालुक्यातील पळू गावातील स्मशानभूमी ला जागेच्या वादाचा कोरोना झाला असून यामुळे ती शेवटच्या घटका मोजत आहे. या करीता तीनदा लाखोंचा निधी परत गेल्याचे मुरबाड पंचायत समिती कडून सांगण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कल्याण, जुन्नर असा व्यापार नानेघाट मार्गे होत होता. या घाटातून कित्येकदा महाराज कल्याण येथे आले होते. या घाटात 960 पाय-या आहेत. नानेघाट आणि दारेघाट यातून खंडोबाची नदी वाहते. अंत्यत शुद्ध पाणी असल्याने आजुबाजुचे लोक हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. दारेघाटाच्या पर्वत रांगेत सोनावळे गावापासून काही अंतरावर ऐतिहासिक लेणी आहेत. तसेच धसई पळू रस्त्याच्या बाजूला धसई डॅम तुडूंब भरलेला आहे. यांच्या बाजूने असलेल्या डोंगरांच्या रांगा आणि त्यावर जमा झालेले ढग व याचे डॅम मधून दिसणारे प्रतिबिंब सगळे कसे मनमोहक व आल्हाददायक वातावरण वाटते. निसर्गाने चार हाताने येथे नैसर्गिक सौंदर्याची उधळपट्टी केल्याचा अनुभव येथे येता..
अशा अंत्यत मनप्रसन्न करणा-या वातावरण एक गोष्ट खटकते ती म्हणजे वैकुंठ धाम अर्थात स्मशानभूमी.
पळू गाव आणि विद्यानगर( पाडा) अशा दोन गावाची मिळून पळू ग्रामपंचायत आहे. गावात 7/8 बोअरवेल तर 3 विहिरी आहेत. काही वर्षांपूर्वी येथून पाणी पुरवठा कारणासाठी नळयोजना राबविण्यात आली जागोजागी स्टड पोस्ट बसविले परंतु आजपर्यंत नळाला पाणी काय आले नाही. दोन्ही गावाची लोकसंख्या जेमतेम 400/500, पण राजकारण मात्र घराघरात!
गावातून फेरफटका मारला तर ग्रामपंचायतीने ब-यापैकी विकास कामे केली आहेत. यामध्ये रस्ता, फेव्हरब्लाॅक, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, शाळा, उपकेंद्र आदी कामे दिसून येतात. पण छोट्याश्या नाल्याच्या बाजूला उभा असलेला स्मशानभूमी चा सडलेला सांगाडा पाहिला की आदीवाशी, कातकरी समाजातील कुपोषित बालकांची आठवण येते. त्याचे कसे कुपोषणाने सर्व शरीराचे पार्ट दिसतात तशी अवस्था या स्मशानभूमीची झाली आहे.
ही स्मशानभूमी ज्या जागेवर कशीतरी उभी आहे. ती जागा कोणाची आहे हे कोणालाच माहीत नाही. मात्र याच्या बाजूला रमेश लक्ष्मण मोरे या शेतकऱ्यांची भातशेती आहे असे ते सांगतात. या जागेची मोजणी झाली तर स्मशानभूमीचा प्रश्न सुटू शकतो. पण शासकीय उदासीनता व राजकर्ताचे दुर्लक्ष यामुळे स्मशानभूमी ला जागेच्या वादाचा कोरोना झाला आहे. व यामुळे तिचा श्वासोच्छ्वास गुदमरतो असून ती कधी कोसळेल. हे सांगता येत नाही.
तसेच येथील नागरिकांना शेतीचा मुख्य आधार आहे. दुसरा कोणताही रोजगार नाही. पण निसर्गाने दिलेल्या वरदानाचा येथे पर्यटन विकास केंद्र म्हणून निर्माण केले तर आजुबाजुच्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, गावात राजकारण होणार नाही. पर्यायाने स्मशानभूमी चा प्रश्न मार्गी लागेल. या स्मशानभूमीच्या प्रश्नाविषयी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार यांना विचारले असता येथे जागेचा वाद आहे. या स्मशानभूमी बांधकामासाठी प्रथम साडेतीन लाख, नंतर 5लाख आणि आता 10 लांखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु या वादापायी परत गेला आहे.
त्यामुळे गावातील तरुण व तरुणींनी एकत्र येऊन गावाचे हित कशात आहे. याचा विचार करून हा प्रश्न सामज्यांने सोडवून नोकरी व कामधंद्यासाठी बाहेर न जाता गाव पर्यटन स्थळ म्हणून कसा विकास करता येईल व यातून रोजगार निर्मिती कशी होईल याचा विचार करायला हवा. याला प्रशासनाने देखील कागदेघोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती करावी हिच अपेक्षा!

No comments:
Post a Comment