मुरबाडमध्ये शिवसेनेतर्फे कंगना राणावतच्या पोष्टरला जोडे मारून निषेध !!
मुरबाड - {मंगल डोंगरे} :
मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या आणि महाराष्ट्रात सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मुरबाड तालुका शिवसेनेने प्रतिकात्मक पोष्टरला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी महिला शिवसैनिकांनी कंगना हिच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.सदर प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार,तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,माजी उपसभापती रामभाऊ दळवी, जि प सदस्य रेखा कंटे,महिला आघाडी तालुका प्रमूख योगिता शिर्के,जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे,माजी उपसभापती अनिल देसले,अंजना जाधव,मुरबाड शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे, दळवी सर तसेच शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment