श्री क्षेत्र प्रति पंढरपूर धानिवली येथे आधार फाऊंडेशन सामाजिक सेवा संस्थेचा सभासद संपर्क मेळावा संपन्न !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : रविवार दि. 06/09/2020 रोजी श्री क्षेत्र प्रति पंढरपूर धानिवली येथे" शोध चांगल्या माणसांचा"..... या शीर्षका खाली मुरबाड तालुक्यातील धर्म, पंथ, पक्ष, जात, पद या पलीकडे सामाजिक काम करणारी अग्रगण्य संस्था यांचा नुकताच सभासद संपर्क मेळावा पार पडला.
संस्थेने कोरोना संक्रमण आपत्तीचे भान ठेऊन सरकारी, आरोग्य विषयक नियमांचे पालन करून कोरोना संक्रमण आपत्ती, भीती व त्यावरील सामाजिक जबाबदारी यावरील जागृती साठी चर्चा करण्यात आली.
समाजातील सुशिक्षित व चांगल्या माणसांच्या सवांदाची गरज या विषयावर भालचंद्र गोडांबे सरांनी माहिती दिली. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास कोर यांनी सामाजिक कार्यात शिकवणे व सूचना यापेक्षा सहभाग महत्वाचा या विषयावर मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्वांनी संस्था वाढीसाठी आमचा कायम सहभाग राहील असे सांगितले.
संस्थेने अल्पावधीत सभासद वाढ व भरीव कार्य केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. इतर सामाजिक संस्थेच्या तुलनेत आधार फाऊंडेशन संस्थेचे उद्देश वेगळे असल्याने सर्व सभासदांना सहभाग हवासा वाटतो...
सदर कार्यक्रमाचे नियोजन उत्तम असून प. पू.कमलनाथ नवनाथ महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. नितीन राणे सरांनी प्रास्ताविक केले तर अनंता विशे यांनी आभार मानले.
मेळाव्यात केशव देसले, संतोष चौधरी(माऊली), गजानन भोईर, संजय घुडे, विलास घरत, प्रकाश राणे, कचरू टेकडे, पद्माकर हरड, बापू म्हाडसे, भूषण कोर, सतीश पष्टे, गवाळे सर, लक्ष्मण चोरघे, दिनेश भावार्थे, भगवान गायकर, निलेश ढमके, दिलीप कराळे, पाटील सर (देवगाव), विलास राणे, विनोद कोर, जयवंत ठाकरे, हिरामण राणे, गणेश भोईर, अंकुश खारीक, श्रीधर देशमुख, दिनेश भोईर, कांतीलाल पवार इ सभासद उपस्थित होते.


No comments:
Post a Comment