मुरबाडमध्ये ओरिएंटल कंपनीच्या कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावले मनसे विद्यार्थीसेनेचे देवेंद्र जाधव! !
मुरबाड{मंगल डोंगरे} : एकीकडे गेल्या सहा-सात महिण्यां पासून लाँकडाऊन परिस्थितीला सर्व सामान्य माणूस वैतागला आहे.तर दुसरी कडे याच संधीचा गैरफायदा कंपनी मालकांनी उठवायला सुरुवात केली आहे.त्याच अनुषंगाने मुरबाडमधील कंपनीत काम करणाऱ्या कामगारांवरही अन्याय होण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र अशावेळी जिथे -जिथे अन्याय होतो तिथे - तिथे मनसे विद्यार्थीसेना अशा वेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते.याचा प्रत्यय नुकताच मुरबाड शहरातील ओरिएंटल कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराला त्याच्या पगाराचा पुरेपूर हिशेब मिळावा व त्या कामगारावर अन्याय होऊ नये यासाठी मनसे विद्यार्थीसेनेचे धडाडीचे अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी तात्काळ ओरिएंटल कंपनीला भेट देऊन या कंपनीचे मॅनेजर मालपाणी यांच्याबरोबर चर्चा करून सदर कर्मचाऱ्याला ओरिएंटल कंपनीने न्याय द्यावा अशी विनंती केली व या कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराचा योग्य हिशेब मिळावा अशीही सूचना केली.आणि त्याचा योग्य मोबदला मिळवून देण्यात देवेंद्र जाधव यांना यश आले असुन, सुनील बळ्ळाळ हे आजारी असताना त्या काळात त्यांच्या झालेल्या गैरहजेरीचा ठपका ठेवून कुठल्याही प्रकारच्या पुर्व सुचना न देता ,नोकरीवरुन काढून टाकले होते.व याशिवाय त्यांना एक वर्ष भर झाले तरी कंपनीत नवु- दहा वर्ष केलेल्या सेवेचा कुठलाही लाभ दिला नाही. हि गोष्ट देवेंद्र जाधव यांना समजताच त्यांनी मनसे स्टाईलने कंपनी व्यवस्थापना बरोबर बातचित करून सदर कामगाराला योग्य मोबदला मिळवून देण्याचे काम केले.यावेळी त्यांचे सोबत त्यांचे सहकारी वॉर्ड क्रमांक १४ चे शाखा अध्यक्ष ऋषिकेश तेलवणे,आजीम मनियार आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment