माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विकेल ते पिकेल या धोरणावर आधारित ऑनलाईन संवाद कार्यक्रमात शेतकर्यांनी सहभागी व्हावे : तालुका कृषी अधिकारी माणगांव
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आज गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी माननीय श्री.उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते विकेल ते पिकेल या धोरणावर निर्धारित स्मार्ट प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमां मधील सहभागाशी आॅनलाईन संवाद साधणार आहेत.याप्रसंगी मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री श्री.संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री श्री . विश्वजीत कदम , फलोत्पादन राज्यमंत्री आदितीताई तटकरे व शासनाचे विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदर ऑनलाईन शुभारंभ आणि संवाद कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधव आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी माणगाव यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांचे कृषी विभागाच्या यु ट्युब चॅनल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartment.GoM)वर लाइव्ह प्रसारण करण्यात येईल.
याप्रसंगी विकेल ते पिकेल या धोरणा अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अभियानाची सुरुवात करणार आहेत.याप्रसंगी या. मुख्यमंत्री ग्रामपातळीवर कृषी विकास कार्यक्रमाची रूपरेषा मांडून चिंतामुक्त शेतकरी व शेतकरी केंद्रीय विकास यावर आपले विचार मांडणार आहेत.तरी तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी यु ट्युब चॅनल मार्फत सहभाग नोंदवावा अशी विनंती तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment