मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावाजवळील बारवी नदीचे धोकादायक पुलावरील अवजड वाहतुक बंद करा अन्यथा *सावित्रीची पुनरावृत्ती? .
कल्याण (संजय कांबळे) :-- मुंबई ठाणे शहराची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावाजवळील बारवी नदिवरील पुल हा अत्यंत धोकादायक बनला असल्याने त्या पुलावरील अवजड वाहतुक तात्काळ बंद करा अन्यथा सावित्री नदी वरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे वाहन चालक .प्रवासी यांच्यामध्ये घबराट पसरली आहे.
एकीकडे बारवी धरणाची उंची वाढल्यामुळे त्याचे पाण्याची पातळीत वाढ झाल्याने मुरबाड कर्जत पुणे या महामार्गावर असलेल्या बारवी नदीवरील पुल देखील पाण्याखाली गेला असल्याने सुमारे 80 ते 90 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा पुल अत्यंत जिर्ण झाला आहे, त्यामुळे तो धोकादायक बनला असल्याने या पुलावरुन चारचाकी वाहनापेक्षा मोठे ट्रेलर तसेच टँकर ची वाहतुक होत असते
. त्यातच अगोदर धोकादायक बनलेल्या या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असुन कठडे देखील कोसळले असल्याने दोन्ही बाजुचे कठडे तुटल्यामुळे बांधकामाचे लोखंड उघडे पडले असल्याने भंगार चोर देखील या उघड्या पडलेल्या लोखंडावर नजर ठेऊन असल्यामुळे खड्ड्यामुळे नेहमीच अवजड वाहनांची आदळ आपट होत असल्याने कधीही हा पुल कोसळुन मोठी दुर्घटना घडुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या पुलावर महाड येथील सावित्री नदिवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचे संकट ओढवेल अशी भिती व्यक्त केली जात आहे . दरम्यान बारवी नदी वरील पुल हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्रात असला तरी नाशिक शहापुर मुरबाड कर्जत पुणे हा महामार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे असल्याने त्यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हे गेली दोन वर्षे प्रगतीत असुन बारवी नदीवरील पुलाचे बांधकाम देखील ते करणार आहेत तरी जो पर्यंत पुल पाण्याखाली आहे. तो पर्यंत पर्यायी रस्ता व नवीन पुल होणार नाही. असे समजते.त्यासाठी बारवी धरणातील पाणी साठा कमी झाल्याशिवाय पर्यायी व्यवस्था करता येणार नाही.
बारवी डॅम ची उंची वाढवल्याने पाणी साठवण क्षमता वाढली आहे. डॅमचे पाणी अनेक ठिकाणी पसरलेला आहे. डॅमचे पाण्याचा जरी स्वयंचलित दरवाजा तून विसर्ग होत असला तरी हा पुल अनेकवेळा पाण्याखाली गेला होता. पुलाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमी ला केव्हाच जलसमाधी मिळाली आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांची होणारी वाहतूक जीवघेणी ठरू शकते.. म्हणून पुलावर पडलेले खड्डे, कोसळलेले संरक्षक कटडे यामुळे हा प्रवास धोकादायक ठरू शकतो. याचा विचार करून पाणी भरल्याने व दुसरा पर्याय नसल्याने निदान या पुलावरील अवजड. वाहतूक थांबवावी अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून होत आहे.


No comments:
Post a Comment