ना. बाळासाहेब थोरात वायफाय केंद्राचे चेतनसिंह पवार यांच्या हस्ते उद्घाटन !
मुरबाड (मंगल डोंगरे) : मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२० रोजी मुरबाड तालुक्यातील मौजे आंबेळे बु येथे पर्यावरण काॅंग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा ब्लाॅक काॅंग्रेसचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या हस्ते ना.बाळासाहेब थोरात वायफाय केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जयवंत पवार, माजी सरपंच प्रकाश पवार, विचारमंचचे तालुका संघटक स्वप्निल जाधव व विद्यार्थीं- विद्यार्थींनी आदींच्या उपस्थितीत सोशल डिस्टींगचे नियम पाळुन कार्यक्रम साजरा केला. ॲानलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल वरच लेक्चर, तोंडी परिक्षा अथवा गृहपाठ होतात. आणि खेडे गावामघ्ये मोबाईल कंपनीच्या नेटवर्कला चांगली रेंज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचणी येत असल्यामुळे अश्याप्रकारचा लोकउपयोगी उपक्रम हाती घेतल्याचे चेतनसिंह पवार यांनी सांगितले तसेच नवीन तंत्रज्ञानप्रेमी नेते राज्याचे महसुलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे नाव दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
जिल्हा परिषद शाळा आंबेळे" बुद्रुक"मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्या साठी दररोज स.१० वा ते दु. १२ वा पर्यंत मोफत वायफाय उपलब्ध होणार असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शाखाअध्यक्ष रमेश पवार यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment