'ग्रामीण रुग्णालयातील लुटमार प्रकरणी ,डॉ. फड ला, मनसे सैनिक नडला'....
मुरबाड {मंगल डोंगरे} :-मुरबाड तालुक्यातील आरोग्य विभागाचे संगनमताने शासकीय व खाजगी डॉक्टरांनी नागरिकांची लूटमार करण्यासाठी एक प्रकारची साखळी तयार केली असताना ग्रामीण रुग्णालयातील डॉ. नरहरी फड ला मनसे सैनिक चांगलाच नडला असुन त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करत .डॉ. नरहरी फड याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
**डॉ. नरहरी फड हे रुग्णांचे नातेवाईकांकडे पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे लेखी स्वरूपात आल्या असुन त्याबाबत डॉ. फड यांचेकडे खुलासा मागितला आहे. --श्रीमती नम्रता कुलकर्णी. वैद्यकीय अधिक्षिका ग्रामीण रुग्णालय मुरबाड.
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणारे डॉ. नरहरी फड हे प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते .पुढारी,व पत्रकार यांच्याशी सौजन्याने वागत असले तरी ते गोरगरीब व गरजु रुग्णांची आर्थिक लुटमार करत असतात.परंतु त्याचा सबळ पुरावा कोणाकडे नसल्याने डॉ. फड यांची भुक दिवसेंदिवस वाढत चालली होती.त्यासाठी मागील वर्षी त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसा येथे नियुक्ती झालेली असंताना डॉ. फड यांनी वरिष्ठाशी आर्थिकदृष्ट्या संगनमत करुन ते मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर येण्यात यशस्वी झाल्याने त्यांनी खाजगी डॉक्टर तसेच खाजगी पँथोलाँजी लँब मेडिकल स्टोअर यांच्याशी संधान साधत चांगल्या प्रकारे आपले प्रस्तान मांडले.असे असताना एखाद्या गंभीर आजाराचा रुग्ण किंवा प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना नैसर्गिकरित्या प्रसुती होईल म्हणुन ते दोन तीन दिवस खाजगी औषधे देऊन उपचार करायचे त्यामध्ये एखादी महिला नैसर्गिकरित्या प्रसुती झाली नाही तर फड हे खाजगी हाँस्पिटल मध्ये टक्केवारी मिळण्यासाठी तिला सिझर करण्यासाठी पाठवतात तर अनेक महिलांचे अवैधरित्या पैसे घेऊन गर्भपात देखील करतात.
असे असतानाही मुरबाड मध्ये सुरु झालेल्या खाजगी कोविड हाँस्पिटल मध्ये त्यांची भागिदारी असल्याने किरकोळ उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते कोरोना झाला आहे. अशी भिती दाखवून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन त्यांची लुटमार करत असताना दि.19 आँगस्ट रोजी श्रीमती वनिता केशव भोईर मु.गेगाव शहापूर यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्या सरळगाव येथील डॉक्टर कडे गेल्या त्यांना तेथुन.मुरबाड ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता डॉ. फड यांनी सदर महिला हि पाँझिटिव्ह असल्याचे नातेवाईकांना सांगितले तिला बरी करण्यासाठी आपण प्रयत्न करु.त्यासाठी मला 10 हजार रु द्यावे लागतील व 12 हजार रु.ची इंजेक्शन आणावी लागतील .महिलेच्या नातेवाईकांनी सदरची हकीकत हि वनिता भोईर यांच्या मुरबाड येथील बहिणीच्या मुलाचे कानावर टाकला असता विलास हुमणे हा मनसेचा उपाध्यक्ष असल्याने डॉक्टरांनी ते मान्य केले परंतु सदरचा पेंशट हा डॉक्टरांचे अंदाजानुसार पाँझिटिव्ह असताना त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचार केले .उपचार सुरु असताना पेंशटची प्रक्रुती खालावल्याने त्यांनी तिला तात्काळ उल्हासनगर येथे हलविण्यास सांगितले व 23 आँगस्ट रोजी ती दगावली त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉ. फड यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली असली तरी त्यांनी रुग्णाचे नातेवाईकांकडुन दहा हजार रुपये घेतले असुन ते प्रसूतीसाठी देखील पैसे घेत असल्याचे रेकॉर्डिंग केले असुन विलास हुमणे यांनी डॉ. फड यांची वरिष्ठांकडे तक्रार करुन त्यांना निलबिंत करण्याची मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment