*माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यासाठी मुरबाड पंचायत समिती यंत्रणा सज्ज*!
------------------------------
मुरबाड (मंगल डोंगरे) : कोव्हीड १९ या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यासाठी मुरबाड पंचायत समिती यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत गृहभेटी, तपासणी, आजारी व्यक्तींचा शोध , आरोग्य शिक्षण या चतू:सूत्रीचा वापर केला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ व गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी केले आहे.
ही मोहीम १५ सप्टेंबर 2020 ते 25 ऑक्टोंबर 2020 या या कालावधीत घेण्यात येणार असून त्यासाठी 57 टीम संपूर्ण ग्रामीण भागामध्ये तयार केले असून 126 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 98 ग्रामपंचायती ह्या कोरना मुक्त आहेत अशी माहिती पंचायत समिती सभापती श्रिकांत धुमाळ व गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment