कोरोनाचे शेकडो रुग्णांना जीवन दान देणारा तो ठरतोय कोरोना योद्धा !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोनाच्या महामारीत माणुसच एकमेकांचं वैरी ठरू लागला आहे.कोणीही कोणा जवळ जाण्यास धजावत नाही. साधा थंडी ताप सर्दी सारख्या साथीच्या रोगावर उपचार करण्यास खाजगी डॉक्टर धजावत नाहीत. थंडीताप सर्दी झालेल्या रुग्णाजवळ नातलग देखील संशयीत नजरेने पाहत मदत करण्याऐवजी टाळण्याचा प्रयत्न होतो. अशा भयाण परिस्थितीत स्थानिक भूमिपुत्र व सर्वांचे विश्वासू असलेले डॉक्टर प्रमोद पष्टे हेच कोरोना योद्धा म्हणून धावून आले. या महामारीच्या विळख्यातील दोनशे जणांचे प्राण वाचवून कोरोना महामारीवर मात करण्याचा प्रयत्न करणारे डॉक्टर प्रमोद पष्टे म्हणजे तालुक्यातील खरे कोरोना योद्धा ठरले आहेत.
मुरबाड सारख्या दुर्गम तालुक्यातील अनेक रुग्णावर दिवस रात्री आरोग्य सेवा देणाऱ्या रॉयल हॉस्पिटल म्हणजेच योग्य उपचार आणि उत्तम सेवा अशाप्रकारची रुग्णसेवा व गोरगरिबाला परवडण्या सारखं एकमेव रुग्णालयाचे संचालक डॉक्टर प्रमोद पष्टे यांनी इतर रुग्णावर यशस्वी उपचाराचा विश्वासाहर्ता कमावल्याने कोविड १९ अशा भयंकर महामारीवर उपचार करण्याची जबाबदारी शासनाने सोपविल्याने सध्या तालुक्यातील रोजच वाढत्या कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर पष्टे यांच्या कोविड रुग्णालयात आज पावेतो दोनशे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. व कोरोना झालेल्या रुग्णास व त्यांच्या नातेवाईकास एक ठाम असा विश्वास असतो कि आपला रुग्ण डॉक्टर पष्टे यांच्या देखरेखी खाली असल्याने तो पूर्णपणे बरा होऊन घरी येणार.
सर्वांना आपलेसे वाटणारे व सरळ स्वभाव असलेले डॉक्टर पष्टे यांनी जगासमोर सुंदर असे उदाहरण उभे केले आहे.कि आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण प्रेम जिव्हाळ्याची माणसं अशी मिळवा कि कोणाला त्यांची किंमत करता येणार नाही. आणि हे प्रेम डॉक्टर पष्टे यांच्या वाट्याला कोरोना सारख्या महामारीत केवळ डॉक्टर सेवा नव्हे तर ईश्वर सेवेच्या रूपाने पहावयास मिळते.


No comments:
Post a Comment