खुद्द सभापतींच्या निषेधा नंतर शिक्षण विभागाची गाडी धक्का स्टार्ट ?
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेल्या वर्षभरा पासुन गटशिक्षण अधिकारी नसल्याने प्रभारी अधिका-या मार्फत शिक्षण विभागाचे कामकाज बेभरोसेपणे सुरु होते.मात्र प्रभारी गट शिक्षण अधिकारीही रजेवर गेल्याने शिक्षण विभागात कुणी ही जबाबदार अधिकारी नव्हते. त्यातच यंदाचा 5 सप्टेंबर चा शिक्षक दिन उजाडला.शिक्षक गौरवाचा कार्यक्रम होणे गरजेचे असताना याबाबत साशंकता निर्माण झाल्याने नवनिर्वाचित सभापती श्रीकांत धुमाळ व उपसभापती अरुणा खाकर यांनी चक्क गटशिक्षण अधिका-यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून प्रशासनाचा निषेध करून खळबळ उडवून दिली होती. प्रसार माध्यमानी हा विषय उचलून धरला. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला त्याची दखल घ्यावी लागली. आणि मुरबाड शिक्षण विभागाला प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून शिला लांबाटे यांची नेमणूक करावी लागली. श्रीमती लांबाटे यांनी मागील काळात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.मात्र कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने विस्तार अधिकारी आणि शिक्षण विभगाचा अतिरिक्त भार त्यांच्या कडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोनावणे यांनी सोपवुन कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी नेमण्याची जबाबदारी झटकत मुरबाड पंचायत समितीच्या तोंडाला पाने पुसली आहेत.तर दुसरी कडे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे शिक्षक गौरव,कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.त्यामुळे शिक्षक वर्गातुन नाराजीचा सुर ऐकू येत आहे.तर शिक्षण विभागाचा कारभार धक्का स्टार्ट गाडी सारखा असल्याचे बोलले जात असुन ,,अजून किती काळ मुरबाड चा शिक्षण विभाग धक्के देवून चालवावा लागेल हे प्रशासनच जाणो,,अशी प्रतिक्रिया येत आहे.

No comments:
Post a Comment